एन्टरटेन्मेंट डेस्कः रिलीजच्या दीड महिन्यांनंतरसुद्धा 'सैराट' या सिनेमाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. रिलीजच्या एवढ्या दिवसांनीदेखील चर्चेत आलेला सैराट हा एकमेव मराठी सिनेमा आहे. शंभर कोटींकडे वाटचाल करत असलेल्या या सिनेमातील दृश्यन् दृश्य लोकांच्या मनात घर करून राहिले आहेत. यातील प्रत्येक लहान मोठ्या कलाकाराने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
आर्ची आणि परशाप्रमाणेच सिनेमातील सल्या आणि लंगड्या यांच्या जोडीनेही महाराष्ट्राला याड लावलं आहे. त्यातील लंगड्या म्हणजेत तानाजी गळगुंडेने अलीकडेच कपिल शर्माचा 'द कपिल शर्मा शो'चा स्टेज गाजवून सोडला. या मंचावर लंगड्या अर्थातच तानाजीने केलेला झिंगाट डान्स सगळ्यांनीच एन्जॉय केला. इतकेच नाही तर शूटिंगच्या काळात तो रिंकूची कशी खिल्ली उडवायचा याची झलकही त्याने येथे दाखवली. रिंकू आणि आकाशप्रमाणेच तानाजीचीसुद्धा फॅन फॉलोईंग खूप मोठी असल्याची प्रचिती येथे आली. एका तरुणीने चक्क तानाजीला तिला प्रपोज करण्याची विनंती केली.
अतिशय छोट्या गावातून आलेल्या तानाजीने आपल्या अभिनयाने आणि डायलॉगने प्रेक्षकांना याड लावलं आहे. रिलीजच्या एवढ्या दिवसांनंतरसुद्धा प्रेक्षक त्याचे डायलॉग्स पुन्हा पुन्हा ऐकायला वाचायला उत्सुक आहेत. म्हणूनच या पॅकेजमध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, सैराटच्या लंगड्या उर्फ प्रदीपचे खास डायलॉग्स... त्याचे हे हिट डायलॉग्स वाचण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)