आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Actor Vaibhav Mangale\'s Interview On Timepass 2

INTERVIEW : वैभव मांगले म्हणतात, \'\'लोक \'शाकाल\' म्हणताच होतो आनंद\'\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेते वैभव मांगले)

'नया है वह...' हा संवाद प्रत्येकाच्या तोंडी ऐकायला येतो. अतिशय छोटासा पण सर्व वयोगटांतील प्रेक्षकांना अपील करणारा हा संवाद पुन्हा एकदा ऐकण्याची मजा 'टाइमपास 2' चित्रपटाच्या निमित्ताने अनुभवता येणार आहे. नव्या रूपात दगडू आणि प्राजूची प्रेमकहाणी रूपेरी पडद्यावर पाहणे 'फुल टू धमाल' ठरेल, असा विश्वास अभिनेते वैभव मांगले यांनी व्यक्त केला.
मराठीतील पहिली सिक्वेल प्रेमकहाणी असलेला 'टाइमपास 2' प्रेक्षकांच्या भेटीला 1 मे रोजी येत आहे. रवी जाधव दिग्दर्शित या चित्रपटातील गाण्यांनी धमाल उडवून दिली आहे. तांत्रिक कौशल्य, अभिनय, कथा-पटकथा, दिग्दर्शन अशा सर्वच बाजुंनी दमदार असलेल्या या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता असल्याचे सोशल साइटवर दिसून येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
'टाइमपास' चित्रपटातील माझे संवाद प्रेक्षकांना भावले. "नया है वह'च्या निमित्ताने मी प्रत्येकापर्यंत पोहोचलो. कुठूनही वावरत असताना गर्दीतून हमखास आवाज येतो 'शाकाल' तेव्हा आनंद होतो. माझी भूमिका सर्वांच्या लक्षात आहे, याचे समाधानही आहे. पार्ट 2 मध्ये दगडू आणि प्राजक्ता मोठे झाले आहेत, मी म्हातारा झालोय. नवी धमाल, ताजा विनोद देण्याचा प्रयत्न केला आहे. पुन्हा पैसा वसूल अनुभव घेत प्रेक्षक चित्रपटागृहाबाहेर पडतील, असा विश्वास आहे.
'टाइमपास'प्रमाणेच 'टाइमपास 2'ला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्यास याचा तिसरा भागसुद्धा येईल, अशी छोटीशी हिंटदेखील वैभव यांनी दिली.
पुढील स्लाईड्समध्ये वर क्लिक करा आणि छायाचित्रांमध्ये पाहा 'टाइमपास 2'मधील वैभव मांगले यांची खास झलक...