आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गँगस्टर विनीत शर्मा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
प्रत्येक कलाकाराला आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका कराव्यात असं वाटत असतं. आजवर अनेक चित्रपटांमध्ये पोलिस इन्स्पेक्टरचीच भूमिका साकारणारे अभिनेते विनीत शर्मा आता चक्क एका गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहेत. 5 जी इंटरनँशनल प्रस्तुत व सचिन कटारनवरे निर्मित ‘भय’ या सिनेमात विनीत यांचा हा गँगस्टर लुक पहायला मिळणार आहे. 24 मार्चला प्रदर्शित होणाऱ्या ‘भय’ चित्रपटाचं दिग्दर्शन व संकलन राहुल भातणकर यांचं आहे.

आपल्या या वेगळ्या अंदाजातील भूमिकेबद्दल बोलताना विनीत सांगतात की, आजवर मला पोलिस इन्स्पेक्टरचेच रोल साकारायला मिळाले. ‘भय’ मधून मी प्रथमच वेगळी भूमिका करतोय. माझा जन्म चेंबुर विभागातला असल्याने गँगस्टरच्या लकबी मी अगदी जवळून पाहिल्या आहेत. ‘भय’मध्येही माझ्या रोलसाठी गँगस्टरच्या या लकबी मी आवर्जून घेतल्या आहेत. ‘भय’च्या निमित्ताने वेगळी भूमिका करायला मिळाल्याचा आनंद निश्चित आहे.

अभिजीत खांडकेकर, उदय टिकेकर, सतीश राजवाडे, स्मिता गोंदकर, संस्कृती बालगुडे विनीत शर्मा, सिद्धार्थ बोडके, शेखर शुक्ला, नुपूर दुधवाडकर, धनंजय मांद्रेकर या कलाकारांच्या भूमिका या चित्रपटात आहे. या चित्रपटाचे सहनिर्माते अजय जोशी असून आशिष चौहान कार्यकारी निर्माता आहेत. सहकारी निर्माते अनिल साबळे आहेत. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद नितीन विजय सुपेकर यांचे आहेत. कलादिग्दर्शन प्रशांत राणे यांचं असून सिनेमॅटोग्राफर राजेश राठोर आहेत.
बातम्या आणखी आहेत...