आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Celebrity Holi : यंदा होळीच्याच दिवशी वाढदिवस आल्याने होणार डबल सेलिब्रेशन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'खुलता कळी खुलेना' या मालिकेत मोनिका ही निगेटिव्ह शेडची भूमिका वठवणारी अभिनेत्री म्हणजे अभिज्ञा भावे. या मालिकेच्या माध्यमातून अभिज्ञा घराघरांत पोहोचली आहे. अभिज्ञासाठी यंदाची होळी अतिशय खास आहे. कारण होळीच्याच दिवशी तिचा वाढदिवस आहे. त्यामुळे यंदाचे कसे असेल सेलिब्रेशन, अभिज्ञाला होळी खेळायला आवडतं का.. हे आम्ही तिच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. 

चला तर मग जाणून घेऊयात, कशी असते अभिज्ञाची होळी...  
 
अभिज्ञा म्हणते, ''यावर्षी होळीच्याच दिवशी माझा वाढदिवस असल्याने माझ्या घरचा माहोल वेगळाच असेल. मला होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाला जे रंग एकमेकांना लावले जातात, ते अजिबात आवडत नाहीत. त्या दि‌वशी जे फुगे मारले जातात, त्यामुळे कोणाला तरी इजा होते, लागते. या गोष्टीमुळे जो इनकन्व्हिनियन्स होतो तो अयोग्य असतो. त्यामु‌‌ळे होळीच्या दिवशी मी घराच्या बाहेरच पडत नाही. हे माझ्या मित्रमंडळींना माहिती असल्याने ते त्या दिवशी माझ्या घरी मला अत्यंत सुरक्षित वातावरणात बाहेर घेऊन जातात. म्हणजे त्या रंगांची झळ माझ्यापर्यंत पोहोचणार नाही अशी दक्षता घेतात.''

पुढे वाचा, काही वर्षांपू्र्वी होळीच्या दिवशी अभिज्ञासोबत घडली होती एक वाईट घटना...  
बातम्या आणखी आहेत...