आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमृता खानविलकर पुन्हा हॉस्पिटलमध्ये, पोटदुखीमूळे आजारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमृता खानविलकर पडली आजारी
‘नच बलिये-७’ जिंकल्यावर खर तर, अमृता खानविलकरने सध्या खूप खुशीत असायला हवं होतं, तिने आपल्या मित्रमेंडळींसोबत आणि नातेवाईकांसोबत पार्टी एन्जॉय करणं अपेक्षित होतं. मात्र सध्या अमृता खानविलकर हॉस्पिटलमध्ये दाखल झालीय.
मंगळवारी प्रचंड पोटदूखीमूळे नाईलाजास्तव तिला हॉस्पिटलमध्ये एडमिट करावं लागलंय. ‘नच बलिये’ मध्ये सहभागी झाल्यानंतरची ही दूसरी वेळ आहे, जेव्हा अमृताला अशा पध्दतीने एडमिट करावं लागलंय. गेल्या महिन्यातही तिच्या ‘वेलकम जिंदगी’ चित्रपटाच्या प्रमोशनच्यावेळी ती अशीच आजारी पडली होती. आणि तिला हॉस्पिटलमध्ये एडमिट करावं लागले होते. आणि मग ती चित्रपटाचे व्यवस्थित प्रमोशन करूच शकली नव्हती. आता स्पर्धा संपल्यावर पुन्हा एकदा तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले आहे.
तिच्या या आजारपणाविषयी तिच्या पब्लिसिस्टकडून कळतंय की, “एक्चुअली ती झलक हाऊसमध्ये गेल्यावर तिचं खाणं-पिणं बदललं होतं. अमृता नेहमीच घरचंच जेवणं जेवते. ती बाहेरचं जेवणं फार कमी खाते. जेवण-खाणं बदलण्यासोबत सहा-सात तास ती रिहर्सल्स करायची. शरीरावर या सगळ्याचा परिणाम झालाय. पण आता काळजीचे काही कारण नाही, ती सध्या अंडर ऑब्झर्व्हेशन आहे. तिला बहूधा आता काहीवेळात डिस्चार्जही मिळेल.”
याबद्दल तिच्या नव-याशी हिमांशू मल्होत्राशी बोलल्यावर तो म्हणतो,”हो, आता ती ठिक आहे. आणि तिला लवकरच डिस्चार्ज मिळेल. काळजीचे कारण नाही. मी तिच्यासोबतच हॉस्पिटलमध्ये आहे.”
पुढील स्लाइडमध्ये पाहा, नच बलिये-७ जिंकल्यानंतरचे अमृता-हिमांशू