आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marahti Actress Apurva Nemlekar Tie Knot With Rohan Deshpande

वाजलं रे वाजलं... रोहन देशपांडेसोबत अभिनेत्री अपुर्वा अडकली लग्नगाठीत, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अपुर्वा आणि रोहन यांच्या लग्नातील एक छायाचित्र)

मराठी सिनेसृष्टीत सध्या सनई चौघड्यांचे सूर उमटू लागले आहेत. अलीकडेच अभिनेता पुष्कर जोग, स्पृहा जोशी, रिमा लागू यांची कन्या मृण्मयी लागू हे सेलिब्रिटी लग्नगाठीत अडकले. या मराठी सेलिब्रिटींप्रमाणेच छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाची वेगळी छाप उमटवणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर ही देखील आज बोहल्यावर चढली. रोहन देशपांडेसोबत अपुर्वा लग्नगाठीत अडकली. पारंपरिक पद्धतीने हा लग्नसोहळा रंगला.
झी मराठी वाहिनीवरील 'आभास हा' या मालिकेद्वारे अपूर्वा घराघरांत पोहचली. या मालिकेनंतर ती 'आराधना' या मालिकेत मध्यवर्ती भूमिकेत झळकली.
रोहन युवासेनेचा पदाधिकारी असून गेल्या आठ वर्षांपासून अपूर्वा त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. गेल्यावर्षी 10 डिसेंबर रोजी मुंबईतील शिवाजी पार्कस्थित हॉटेल स्टेटसमध्ये या दोघांच्या साखरपुड्याचा कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडला होता.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा अपुर्वा आणि रोहनच्या लग्न आणि हळदीच्या कार्यक्रमाची खास छायाचित्रे...