आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actress Harshada Khanvilkar Danced For The First Time

Xclusive: OMG रूपालीने नाचवलंच शेवटी आक्कासाहेबांना, पाहा, सूनेच्या तालावर नाचतेय सासू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आक्कासाहेबांना नाचवलं रूपालीने
आक्कासाहेब ह्या करारी आणि आपल्या सूनांना आपल्या धाकात ठेवणा-या सासूबाई आहेत. हे गेली चार वर्ष आपण ‘पुढचं पाऊल’ मालिकेत पाहिलंच आहे. आक्कासाहेबांना आपल्या मुठीत ठेवण्यासाठी आणि घराच्यांना आपल्या तालावर नाचवण्यासाठी गेले अनेक एपिसोड्स रूपालीने अथक प्रयत्न केले. पण शेवटी रूपालीचे सर्व प्रयत्न फोल ठरले असताना, रूपाली-रोहितच्या लग्नात शेवटी अपेक्षेप्रमाणे एक व्टिस्ट आलाच. रूपालीने शेवटी आक्कासाहेबांना भर मंडपात सगळ्यांच्या समोर नाचायला लावलंच.
पण कसं?... आणि का?... हे सांगितलं आक्कासाहेबांच्या लाडक्या सूनेने कल्याणीनेच. कल्याणी सांगते,”रूपाताईंनी सासूबाईंकडून लग्नात एक वचन घेतलंय. सासूबाईंचा असा गैरसमज आहे, की रूपाली मागून मागून काय मागणार?...एखादा दागिनाच ना!... पण रूपाली म्हणते की, तुम्ही नाचून दाखवायचं. आणि आक्कासाहेब चक्क तिचं म्हणणं सुध्दा ऐकतात. त्यामूळे इतके दिवस घरात निर्माण झालेलं टेन्शन निवळायला मदत होते.”
आक्कासाहेब कशा नाचणार?.. ह्यापेक्षा हर्षदाताई कशी नाचणार, ह्याचंच अभिजीत केळकरला टेन्शन होतं. तो म्हणतो,” मग ते देशभक्तीपर गाणं असो, की रोमॅंटिक साँग, हर्षदाताईच्या ठरलेल्या स्टेप्स असतात. आणि त्या ती तशाच करते. त्यामुळे हर्षदाताई नाचणार कशी ते कळतं नाहीये.”
अभिजीतचं हे टेन्शन अगदी खरं होतं. हे देवकीकाकू म्हणजेच अभिनेत्री मृणाल देशपांडे म्हणते, ”आमच्याकडे एक जोक आहे, की,’हर्षदाचा डान्स करण्यामध्ये ‘हात’खंडा आहे’. हातखंडा म्हणजे काय, तर पाय न हलवता हातानेच काय ते नाचायचे.”
पुढील स्लाइडमध्ये वाचा, शेवटी कसा केल आक्कासाहेबांनी डान्स?.. आणि कोणी नाचवलं त्यांना?