आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही ग्लॅमरस अभिनेत्री रात्रभर झोपली रस्त्यावर,का? जाणून घ्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्लॅमरस अभिनेत्री कश्मिरा कुलकर्णी
एखादा पुरूष रस्त्यावर एकवेळ झोपू शकतो. पण आजकालच्या जमान्यात एखाद्या मुलीला थोडावेळ जरी रस्त्यावर कुणाची वाट पाहायची असेल, तर आजूबाजूचे बघे, तिला नखशिखांत न्याहाळून हैराणजीव करून सोडतात. तर मग एखाद्या तरूण, सुंदर, ग्लॅमरस, हॉट अभिनेत्रीला रात्रभर रस्त्यावर झोपावे लागले तर?
’31 डिसेंबर’, ‘मध्यमवर्ग’, ‘डब्बा ऐस पैस’, आणि आता ‘कॅरी ऑन मराठा’ चित्रपटात काम केलेली अभिनेत्री कश्मिरा कुलकर्णीला मुंबईत पाऊल ठेवताच एक अख्खी रात्र रस्त्यावर झोपून काढावी लागलीय.
कश्मिरा या अनुभवाबद्दल सांगते,”माझी आई 'नाचे मयुरी' चित्रपट पाहायला गेली असताना, सिनेमाहॉलमध्ये माझा जन्म झाला. तेव्हापासून आईची इच्छा होती, मी मोठी होवून अभिनेत्री व्हावं. नाटकांमध्ये कामही करत होते. आणि अचानक ‘चार दिवस सासूचे’ या मालिकेसाठी कास्टिंग सुरू असल्याचे कळले. आई काही वर्षांपूर्वी गेली होती, पण तिच्या इच्छेची आठवण होऊन मला मन शांत बसू देईना. तिने माझ्यासाठी लहानपणी केलेले दागिने माझ्या जवळ होते. ते विकले, आणि ऑडिशनसाठी मुंबईत पोहोचले. त्या अगोदर कधीही मुंबई पाहिलीही नव्हती. तो दिवस आजही आठवतोय. ८ जून २०११ हा तो दिवस होता. मी ऑडिशनसाठी मुंबईला येताना आता इथेच राहायचे असे ठरवूनच आले होते. एका टेम्पोत माझे सगळे सामन टाकले आणि मुंबई गाठली होती. मुंबईत भाड्याच्या घरासाठी एका ब्रोकरशी बोलले होते. पण त्यादिवशी मुंबईत खूप पाऊस पडत होता. आणि ब्रोकरने सांगितले, अजून तुमची रूम तयार नाही. मला ऑडिशनला जाणे गरजेचे होते. अंधेरीच्या 'कॅफे कॉफी डे'च्या बाहेर उभ्या असलेल्या वॉचमनकडे माझे सामान ठेवले. आणि पहिल्यांदा ऑडिशनला पळाले.”
पुढील स्लाइडमध्ये वाचा, कशी काढली, ती रात्र मुंबईत कश्मिराने