आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1st Wedding Anniversary: लग्नात पेशवाई थाटात सुंदर सजली होती मृण्मयी, केले आहे अरेंज मॅरेज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'कुंकू' मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री मृण्मयी देशपांडेच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. व्यावसायिक असलेल्या स्वप्नील रावसोबत मृण्मयी 3 डिसेंबर 2017 रोजी विवाहबंधनात अडकली होती. लग्नात मेहंदीपासून ते रिसेप्शनपर्यंत मृण्मयीचा सुंदर लुक तिच्या चाहत्यांना पाहायला मिळाला होता. तिच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त तिच्या लग्नाचे काही खास फोटोज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. मृण्मयीने केले आहे अरेंज मॅरेज....

 

मृण्मयी आणि स्वप्नीलचे हे अरेंज मॅरेज आहे. स्वप्नील एक बिझनेसमन आहे. लग्नापूर्वी मृण्मयीच्या मेंदी, संगीत सेरेमनीचे फोटोज समोर आले होते. या छायाचित्रांमध्ये मृण्मयी स्वप्नीलसोबत ठुमके लावताना दिसली होती. संगीत सेरेमनीत अभिनेता अभिजीत खांडकेकर आणि त्याची पत्नी सुखदा खांडकेकर यांनी हजेरी लावली होती. अभिजीतने संगीत सेरेमनीचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमात मृण्मयी आणि स्वप्नीलसोबत त्यांच्या कुटुंबीयांनीही ताल धरला होता.

 

अग्निहोत्र, कुंकू यासारख्या मालिका आणि नटसम्राट, कट्यार काळजात घुसली या हिट चित्रपटांतून प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या मृण्मयी देशपांडेचा विवाह सोहळा ३ डिसेंबरला पार पडला. मृण्मयी व्यावसायिक स्वप्नील राव याच्याशी विवाहबद्ध झाली आहे. पेशवाई थाटामाटात हा विवाहसोहळा पार पडला. महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, सिद्धार्थ चांदेकर, अभिजीत खांडकेकर, सुखदा खांडकेकर यांसह अनेक सेलिब्रेटींनी या विवाहसोहळ्याला हजेरी लावली होती. 'बिग फॅट वेडिंग' असलेल्या या विवाहसोहळ्यात संगीत आणि मेहंदी कार्यक्रमही आयोजित करण्यात आले होते. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, मृण्मयी देशपांडेच्या लग्नाचे काही खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...