आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS : पेशवाई थाटात बिझनेसमन स्वप्नीलसोबत बोहल्यावर चढली मृण्मयी, बघा लग्नाचा थाट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'अग्निहोत्र', 'कुंकू' या मालिका तर 'नटसम्राट', 'कट्यार काळजात घुसली' या सिनेमांमधून रसिकांच्या मनात अढळस्थान मिळवणारी मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे 3 डिसेंबर रोजी लग्नाच्या बेडीत अडकली. बिझनेसमन स्वप्नील रावसोबत मृण्मयी लग्नाच्या बोहल्यावर चढली. अगदी पारंपरिक पद्धतीने दोघांचे शुभमंगल पार पडले.
मृण्मयी आणि स्वप्नील यांचा लग्नाचे वैशिष्ट्य म्हणजे दोघांच्या लग्नाचा थाट पेशवाई होता. आकर्षक साडीमध्ये नवराई मृण्मयीचं सौंदर्य आणखी खुलून गेले होते. नवरी इतकी नटूनथटून तयार असताना नवरदेव स्वप्नीलसुद्धा मागे कसा राहील. स्वप्नीलने खास पेशवे स्टाइलची पगडी आणि कपडे परिधान केले होते. विशेष म्हणजे या लग्नात व-हाडींनीही पेशवे स्टाइलची पगडी घातली होती.
मृण्मयी आणि स्वप्नीलच्या लग्नाला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक प्रसिद्ध चेहऱ्यांनी हजेरी लावत या नवदाम्पत्याला शुभाशिर्वाद दिले. महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, सिद्धार्थ चांदेकर, अभिजीत खांडकेकर, सुखदा खांडकेकर, सुनील बर्वे यांसह अनेक सेलिब्रेटींनी या विवाहसोहळ्याला हजेरी लावली होती. मृण्मयीच्या लग्नसोहळ्याचे फोटोज सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहेत.
पाहुयात मृण्मयी आणि स्वप्नील यांच्या लग्नाचे खास फोटोज....

(छाया सौजन्यः मृण्मयी देशपांडे आणि P16Studios फेसबुक)
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...