Home | Bollywood | Marathi Cinekatta | Actress Mrunmayee Godbole In Chi Va Chi Sau Ka

गिरीजा ओकची सख्खी नणंद आहे ही अॅक्ट्रेस, अशी मिळाली 'चि. व चि. सौ. कां'मधील भूमिका

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 22, 2017, 01:46 PM IST

19 मे रोजी थिएटरमध्ये हा सिनेमा दाखल झाला आहे. या सिनेमात अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री मृण्मयी गोडबोले यांच्या मुख्य भूमिका आहेत.

 • Actress Mrunmayee Godbole In Chi Va Chi Sau Ka
  'एलिझाबेथ एकादशी’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपटानंतर दिग्दर्शक परेश मोकाशी आणि लेखिका मधुगंधा कुलकर्णी 'चि. व चि. सौ. कां.' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आले आहेत. 19 मे रोजी थिएटरमध्ये हा सिनेमा दाखल झाला आहे. या सिनेमात अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री मृण्मयी गोडबोले यांच्या मुख्य भूमिका आहेत. ललितचा हा पहिला तर मृण्मयीचा हा तिसरा सिनेमा आहे. प्रेक्षकांसोबतच समीक्षकांनीही या सिनेमाला पसंतीची पावती दिली आहे. या सिनेमात मृण्मयीने साकारलेल्या डॉक्टर सावित्रीच्या भूमिकेचे विशेष कौतुक होत आहे.

  या पॅकेजमधून जाणून घेऊयात कोण-कोण आहे मृण्मयीच्या कुटुंबात आणि तिला कशी मिळाली 'चि. व चि. सौ. कां'मधील सावित्रीची भूमिका..

 • Actress Mrunmayee Godbole In Chi Va Chi Sau Ka
  वहिनी गिरीजा ओक आणि भाऊ सुहृद गोडबोलेसोबत मृण्मयी गोडबोले

  अभिनेत्री गिरीजा ओकसोबत आहे खास नाते...


  मृण्मयीला अभिनयाचा वारसा घरातूनच मिळाला आहे. मृण्मयीचे वडील श्रीरंग गोडबोले हे प्रसिद्ध मराठी अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक आहेत.  मृण्मयीला एक थोरला भाऊ असून सुहृद गोडबोले हे त्याचे नाव आहे. मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री गिरीजा ओक ही सुहृदची पत्नी आहे. या नात्याने गिरीजा ही मृण्मयीची नणंद आहे. 

 • Actress Mrunmayee Godbole In Chi Va Chi Sau Ka
  पती निखिल महाजनसोबत मृण्मयी गोडबोले

  विवाहित आहे मृण्मयी, नवरा आहे दिग्दर्शक...


  मृण्मयीचा नवरासुद्धा सिनेसृष्टीतच कार्यरत आहे. निखिल महाजन हे मृण्मयीच्या नव-याचे नाव असून तो मुळचा औरंगाबादचा आहे आणि प्रसिद्ध दिग्दर्शक आहे. त्याला त्याच्या पहिल्याच ‘पुणे 52’ चित्रपटासाठी दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला आहे. त्याने 2007 मध्ये ‘अकल्पित’ हे थ्रिलर नाटक, तर 2008 मध्ये ‘मला शोधताय का?’ हे विनोदी नाटक केले. ‘एका बंगल्यात घडले’ अशा नाटकांनी आवड वाढत गेली. यानंतर इंजिनिअरिंग सोडून ऑस्ट्रेलियात इंटरनॅशनल फिल्म स्कूल, सिडनीमध्ये दाखल झाला. भारतात परतल्यावर रामगोपाल वर्मा यांच्याकडे काम सुरू केले. हिंदुजा ग्रुपच्या प्रॉडक्शन कंपनीसाठी ‘बिल्ला 2 ’ या तामिळ चित्रपटाच्या ‘स्क्रिप्ट डॉक्टरिंग’चे काम केले आहे. 

 • Actress Mrunmayee Godbole In Chi Va Chi Sau Ka

  अशी मिळाली 'चि. व चि. सौ. कां'मधील सावित्रीची भूमिका..  


  मृण्मयीकडे शेरलॉक नावाचा कुत्रा आहे आणि या सिनेमाचे दिग्दर्शक परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी यांच्याकडे टप्पू आणि चिमू असे दोन कुत्रे आहेत. मृण्मयीने शेरलॉकमुळेच ही भूमिका मिळाल्याचे एका मुलाखतीत सांगितले आहे. मृण्मयीने सांगितले, ''एकदा मी परेश मोकाशी आणि मधुगंधा यांच्यासोबत कुत्र्यांचे पालन पोषण, त्यांना दात येणे वगैरे विषयावर गप्पा मारत होतो आणि परेश मला म्हणाले, म्हणजे तू प्राण्यांसोबत कम्फर्ट आहेस तर.. आणि मग पुढे हा सिनेमा आणि रोल असा प्रवास घडला. मला मांजरांची प्रचंड भीती वाटायची, पण या सिनेमांत मी एका खोलीत तब्बल २० मांजरांसोबत एकटीने शूट केले आहे. करणार काय मी त्यांची डॉक्टर आहे ना! वाटणारी भीती कुठेही जाणवू न देता मी ते करु शकले. या सिनेमात मांजर, कुत्रा, घोडा, गाढव अशा सर्व प्राण्यांसोबत काम केले आहे.''

   
 • Actress Mrunmayee Godbole In Chi Va Chi Sau Ka

  अशी केली भूमिकेसाठी तयारी.. 


  'चि. व चि. सौ. कां' या सिनेमाचे बहुतांश शूटिंग हे पुण्यात झाले आहे. तर मुंबईत ‘अ‍ॅनिमल मॅटर टू मी’ नावाची एक संस्था आहे. तिथे एक महिला डॉक्टर आहेत. खूप मनापासून त्या प्राण्यांची देखभाल करतात. पाळीव प्राण्यांविषयी मार्गदर्शन, व्हॅक्सीनेशन आदी सर्व बाबी त्या समरसतेने करतात. मृण्मयी सांगते, ''मला जी सावित्री साकारायची होती, त्यात हा रोल मला कॅरी करायचा होता. त्यामुळे या सेंटरचे, कामकाजाचे मी अवलोकन केले आणि माझ्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केला.''

 • Actress Mrunmayee Godbole In Chi Va Chi Sau Ka

  सिनेमासाठी घेतले ‘कुंग-फू’चे धडे...


  या सिनेमासाठी मृण्मयीने ‘कुंग-फू’चे धडे घेतले आहेत. मृण्मयीने तिच्या कुंग फू प्रशिक्षणाबद्दल सांगितले, “मी या आधी कलरीपयट्टू शिकले आहे आणि 10 वर्षे बास्केटबॉल सुद्धा खेळले आहे. पण या आधी ‘कुंग फू’ कधीच शिकले नव्हते. सिनेमाच्या शूटिंगच्या एक महिना आधी मला आणि ललितला ‘कुंग फू’चं प्रशिक्षण देण्यात आलं. मी सिनेमात कुंग फूमध्ये ब्लू बेल्ट असलेल्या मुलीचं पात्र साकारलंय. खूप मेहनत आणि प्रॅक्टिस करून मी कुंग फू शिकले आणि त्यात मला माझ्या कलरीपयट्टू आणि बास्केटबॉल ट्रेनिंगची खूप मदत झाली."
   

 • Actress Mrunmayee Godbole In Chi Va Chi Sau Ka

  मृण्मयी गोडबोले फर्ग्युसन कॉलेजमधून फिलॉसॉफी ग्रॅज्युएट आहे आणि ती थिएटर अॅक्टर आहे.

 • Actress Mrunmayee Godbole In Chi Va Chi Sau Ka

  मृण्मयीने छोट्या पडद्यावर 'अग्निहोत्र' या मालिकेत काम केले आहे. 

 • Actress Mrunmayee Godbole In Chi Va Chi Sau Ka

  'राजवाडे अँड सन्स' आणि 'बाजी' या दोन मराठी सिनेमांत मृण्मयी यापूर्वी झळकली आहे. 

Trending