आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्षाबंधन 2017 : सोबत नसलो तरी गिफ्ट्स न चुकता पाठवतो भाऊ, सांगतेय मुक्ता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाऊ आणि वहिनीसोबत अभिनेत्री मुक्ता बर्वे - Divya Marathi
भाऊ आणि वहिनीसोबत अभिनेत्री मुक्ता बर्वे
अभिनेत्री मुक्ता बर्वे रक्षाबंधन आणि भाऊबीज या दोन सणांची आवर्जुन वाट पाहात असते. लहानपणापासूनच या दोन सणांचं तिला अतिशय आकर्षण वाटतं. रक्षाबंधनाच्या निमित्ताने मुक्ताने divyamarathi.com सोबत या सणाविषयीची तिची एक्साइटमेंट शेअर केली आहे. मुक्ताला एक थोरला भाऊ आहे.  देवदत्त ऊर्फ देबू बर्वे हे त्यांचे नाव असून ते चित्रकार आणि व्हिज्युअल डिझायनर आहेत.
 
मुक्ता सांगते, "यावर्षी राखी पौर्णिमेची फारशी तयारी केली नाही. कारण माझा भाऊ आता हैदराबादला असतो. सोबत असलो की हा सण सेलिब्रेट करतो. पण यंदा आम्ही सोबत नाहीत. पण रक्षाबंधनाचं गिफ्ट न चुकता माझ्यापर्यंत पोहचणार आहे." 

बालपणीच्या आठवणींना उजाळा देताना मुक्ता म्हणते, "लहानपणापासूनच मला राखी पौर्णिमेविषयी खूप एक्साइटमेंट आहे. कारण भाऊबीज आणि राखी पौर्णिमा हे दोनच सण खास बहिणींसाठी असतात, जेव्हा खरी कमाई होत असते. आज मी कितीही कमवती झाली असली, तरी या खास दिवशी भावाकडून मिळणारे गिफ्ट्स हे अनमोल असतात. या गिफ्ट्सवर मी डोळा लावून असते. आजही माझी बकेट लिस्ट तयार आहे. मला हवे ते गिफ्ट्स तू देच, असा माझा भावाकडे आग्रह असतो. तो उत्साह आजही कायम आहे. भाऊ माझे प्रचंड लाड करतो. त्याचे लग्न झाले आहे. वहिनीसुद्धा माझे खूप लाड पुरवते. सो मजा असते."
 

सेलिब्रिटी रक्षाबंधन स्पेशल... 
रक्षाबंधन 2017 : यंदा गश्मीर रक्षाबंधनाला सोबत नाही, तरी बहीण म्हणतेय ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही!’
रक्षाबंधन 2017 : दोन भावांची लाडकी बहीण आहे सोनाली कुलकर्णी, सांगतेय कसे असते सेलिब्रेशन
रक्षाबंधन 2017 : 'पुढचं पाऊल' फेम स्वप्नालीला नाहीये सख्खा भाऊ, बालपणी बहिणीलाच बांधायची राखी 
रक्षाबंधन 2017 : निर्मिती सावंत आणि कमलेशचे हे रेशमी बंध
बातम्या आणखी आहेत...