आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुबोध भावेसोबत रोमान्स करणा-या या अॅक्ट्रेसला ओळखलंत का तुम्ही, बघा VIDEO

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सक्षम फिल्म्स आणि जीसिम्स प्रस्तूत तसेच सिनेकोर्न इंडिया यांच्या सौजन्याने 'तुला कळणार नाही' हा  चित्रपट उद्या म्हणजे 8 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये दाखल होतोय. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी आणि सुबोध भावे यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. अंजली-राहुलचे पात्र या दोघांनी चित्रपटात साकारले आहे.  लग्नानंतरची प्रेमकथा मांडणारा हा सिनेमा दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे जोशी यांनी दिग्दर्शित केला आहे. नवरा-बायकोच्या नात्यातील गुजगोष्टी  या  चित्रपटात चित्रीत करण्यात आल्या आहेत.  
 
सुबोधसोबत निथा शेट्टी करतेय रोमान्स... 
या चित्रपटात सुबोध आणि सोनालीसोबत निथा शेट्टी ही अभिनेत्री एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. निथाला यापूर्वी आपण स्वप्ना वाघमारे- जोशी यांनी दिग्दर्शित केलेल्या फुगे या चित्रपटात पाहिले होते. फुगेमध्ये सुबोधसोबत निथाची जोडी जमली होती. आता पुन्हा एकदा निथा आणि सुबोधची रोमँटिक केमिस्ट्रीची झलक तुला कळणार नाहीमध्ये बघता येणार आहे. या चित्रपटातील 'मिठीत ये पुन्हा पुन्हा' या गाण्यात निथा सुबोधसोबत फ्लर्ट करताना दिसतेय. हे गाणे गायिका जान्हवी प्रभू अरोरा हिने स्वरबद्ध केले आहे. गाण्यातील दोघांची रोमँटिक केमिस्ट्री लक्ष वेधून घेत आहे.
 
स्वप्नील जोशी निर्मात्याच्या भूमिकेत...  
लग्नानंतरच्या जबाबदा-या, अपेक्षा आणि एकमेकांचे स्वभाव जपत संसाराचा गाडा यशस्वीरित्या पुढे चालवणा-या घराघरातील प्रेत्येक नवरा बायकोची कथा यात पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे. मराठी चित्रपटसृष्टीचा रोमँटीक हिरो स्वप्नील जोशी या सिनेमाद्वारे निर्मात्याच्या भूमिकेतून लोकांसमोर येणार आहे. त्यामुळे स्वप्ना वाघमारे-स्वप्नील जोशी अशी दिग्दर्शक-निर्मात्याची केमिस्ट्रीदेखील यात जुळून आली आहे. तसेच श्रेया कदम, अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक निशानदार ह्या तिकडीने देखील निर्मितीची धुरा सांभाळली आहे.  राहुल आणि अंजलीची लग्नानंतरची प्रेमकथा सांगणारा हा सिनेमा येत्या ८ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 
 
पाहुयात, निथा-सुबोधच्या रोमँटिक केमिस्ट्री दाखवणारी खास छायाचित्रे आणि हो शेवटच्या स्लाईडवर मिठीत ये... या गाण्याचा व्हिडिओ बघायला विसरु नका... 
बातम्या आणखी आहेत...