आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्री निवेदिता सराफांसाठी रेल्वे प्रवास ठरला डोक्याला ताप, वाचा प्रवासात काय-काय घडले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - प्रवाशांना त्रास देण्यासाठी चटावलेल्या उंदरांच्या जाचातून आमदार, खासदारही सुटले नाहीत. आता त्यात अभिनेत्री निवेदिता सराफ यांचीही भर पडली आहे.
निवेदिता यांना लातूरला जाताना आणि येताना दोन्ही वेळेस उंदरांचा जाच सहन करावा लागला. नाटकाच्या प्रयोगासाठी निवेदिता २२ सप्टेंबरला त्या लातूर एक्स्प्रेसने िनघाल्या. त्यांनी एसी सेकंड क्लासचे तिकीट काढले होते. रात्रीचा प्रवास असल्याने त्यांनी आपली पर्स डोक्याखाली ठेवली आणि त्या आपल्या सीटवर झोपी गेल्या. सकाळी जागे झाल्यानंतर सराफ यांनी उठून पाहताच डोक्याखालची पर्स चक्क कुरतडली होती. उंदराच्या त्रासातून सुटका हाेत नाही ताेच सराफ यांच्या मनस्तापात भर टाकणारी आणखी एक घटना याच प्रवासात घडली. ती अशी की, नाटकाचा प्रयोग आटोपून परतीच्या प्रवासात नांदेड देवगिरी एक्सप्रेसने निवेदिता मुंबईकडे निघाल्या होत्या. मात्र तब्बल पाच तास उशिराने ही रेल्वे निघाली. विशेष म्हणजे रेल्वेचा सप्ताह सुरू असतानाच हा प्रकार उघडकीस अाल्याने रेल्वेच्या कारभाराचे वाभाडे िनघाले अाहेत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन वाचा, रेल्वे प्रवासादरम्यान निवेदिता सराफ यांच्यासोबत काय-काय घडले..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...