18 जून रोजी फादर्स डे आहे. याचेच औचित्य साधत अभिनेत्री पूजा सावंत हिने आपल्या मनात असलेल्या वडिलांविषयीच्या भावना सांगितल्या आहेत.
''प्रत्येक मुलीसाठी तिचे बाबा स्ट्राँगमॅन असतात. जेव्हा कधी भीती वाटली कि तिला पहिले तिचे बाबा आठवतात. माझे देखील अगदी तसेच आहे. गम्मत म्हणजे माझा आगामी 'लपाछपी' सिनेमा भुताचा आहे. त्यामुळे सिनेमा पाहताना भीती ही वाटणारच! असो. हा निव्वळ योगायोग असला तरी, बाबा जवळ असले की कसलीच भीती वाटत नाही. मी जेव्हाही खचते तेव्हा माझा पहिला फोन हा बाबांनाच असतो. मला लहानपणापासून जेव्हाही एकटेपणा वाटला तेव्हा त्यांनीच मला आधार दिला आहे. आजही एखादी गोष्ट अडखळली कि मी लगेच बाबांकडे धाव घेते. त्यांच्या मार्गदर्शनाने माझा आत्मविश्वास वाढीस लागतो, ते नेहमीच मला प्रोत्साहन देण्याचे काम करतात. ते स्वभावाने मितभाषी आहेत, त्यामुळे कोणाबरोबर जास्त बोलणे पसंत करत नाहीत. आमच्यातलं बाबा आणि मुलीचं नातं हे अबोल जरी असलं तरी खूप छान आणि गोंडस आहे.''
Father's Day Spl: रसिकाने सांगितली आठवण, म्हणाली, '...आणि बाबांनी मला झेलले'