आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG: ही ग्लॅमरस अभिनेत्री गेली माळशेज घाटातल्या खोल दरीत, कशी जाणून घ्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्लॅमरस अभिनेत्री पूजा सावंत
सर्वसाधारणपणे, स्टंट्स हे काय ते, चित्रपटातल्या हिरोच्या वाट्याला येतात. आणि चित्रपटातल्या हिरोइनला फक्त गाणी, आणि संवादच करायला मिळतात, असं ब-याचदा आपण हिंदी-मराठी चित्रपटांतून पाहिलंय. पण कधी कधी चित्रपटातलं गाणं सुध्दा एखाद्या अभिनेत्रीसाठी एक खूप मोठा स्टंट होऊन जातो.
गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘निळकंठ मास्तर’ ह्या चित्रपटामध्ये अभिनेत्री पूजा सावंतला एक गाणं चित्रीत करताना अहिरेंनी तिला चक्क खोल दरीतच धाडलं.
त्या अनुभवाबद्दल पूजा सावंत सांगते, “गजेंद्र अहिरे हे त्यांच्या परफेक्शनसाठी आणि वास्तववादी चित्रीकरणासाठी ओळखले जातात. जर डोळ्यात पाणी आणायचे असेल, तर ते ग्लिसरीनने नाही, त्या भावना समजून खरोखरीचे डोळ्यात पाणी आणण्यावर ते भर देतात. त्यांच्यासोबत फिल्म करताना प्रत्येक एक्टरला काही ना काही शिकायला मिळतं. ते एक एक्टिंग स्कुल आहेत. पण ह्या चित्रपटात माझ्यावर ‘अधिर मनं झाले’ हे गाणे, चित्रीत करण्यात आले आहे. त्याच्या चित्रीकरणाचा अनुभव मी कधीच विसरू शकत नाही.”
पूजा सांगते, “आम्ही माळशेज घाटात चित्रीकरण करत होतो. चित्रीकरण करता करता आम्ही एका दरीच्या टोकावर पोहोचलो. तेव्हा गजेंद्रसरांना असं वाटलं की, मी दरीच्या दुस-या टोकाला गेले आणि जर आम्ही ते चित्रीकरण केले तर ते अधिक सुंदर दिसेल. मला वाटलं, सर मस्करी करतायत. त्यामुळे मी तशीच उभी होते. पण थोड्यावेळाने सरांनी पून्हा एकदा सांगितलं आणि आता ते खरंच त्यासाठी चित्रीकरणाची तयारी करतायत हे पाहिल्यावर, मला हे कसे करावे हे काही सूचेना”
“दरीच्या दुस-या टोकाला कसं जावं,आता तिथे जायला रस्ता कुठेय? हा मी विचार करत असतानाच सरांनी मला दरीत उतरायला सुरूवात करायला सांगितलं. कारण आता तोच एक दरीच्या दुस-या टोकाला जाण्याचा मार्ग होता. पण फिल्मच्या हिरोइनला गजेंद्रसर तो पर्याय निवडायला सांगतील असं मला वाटलं नव्हतं. त्यामुळे पून्हा एकदा ते मस्करी तर करत नाहीयेत ना, असा विचार करत मी संभ्रमात पडले. पण त्यांच्या चेह-यावरचे भाव ते याविषय खरंच गंभीर असल्याचे दाखवतं होते, आणि मग मला भीती वाटू लागली.”
पुढील स्लाइडमध्ये वाचा, कशी उतरली, पूजा खोल दरीत