आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वप्नील जोशीची ही \'मितवा\' आहे सेल्फी क्रेझी, पाहा खास PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(स्वप्नील जोशी आणि प्रार्थना बेहरे)
स्वप्नील जोशी, सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहरे स्टारर मितवा हा सिनेमा उद्या (13 फेब्रुवारी) थिएटरमध्ये दाखल होतोय. आजच्या तरुणाईला नातेसंबंध जोडणे आणि ते टिकवून ठेवणे अवघड वाटते. त्यामुळे प्रेमामध्ये बांधिलकी जपणे आज महत्त्वाचे मानले जात नाही. याच विषयाचा धागा पकडत प्रेमाचा खरा अर्थ उलगडण्याचा प्रयत्न 'मितवा'द्वारे केल्याचे सिनेमातील प्रमुख कलाकारांनी सांगितले. या सिनेमाद्वारे आम्ही एकमेकांचे 'मितवा' झालो असल्याचे सांगितले.
सोनाली कुलकर्णी म्हणाली की, म्युझिकल लव्ह स्टोरी असलेला 'मितवा' 'व्हॅलेंटाइन डे'च्या एक दिवस अगोदर प्रदर्शित होत आहे. हा एक योगायोग म्हटला पाहिजे. आमच्या सिनेमाच्या निमित्ताने तरुणाई यंदाचा व्हॅलेंटाइन डे 'मितवा डे' म्हणून साजरा करेल. 'मितवा' प्रेमाची एक अनमोल साठवण म्हणूनही जपला जाईल, अशी आशा सोनालीने व्यक्त केली.
या चित्रपटाचे वेगळेपण म्हणजे एक्स झक्कास वाहिनीवर होणाऱ्या लक्स झक्कास हीरोइन टॅलेंट हंटचा किताब पटकवणाऱ्या प्रार्थना बेहरेला या सिनेमात झळकण्याची संधी मिळाली आहे. मितवाद्वारे करिअरमधील मोठी संधी मिळाल्याचा आनंद प्रार्थनाने व्यक्त केला आहे. मुळची बडोद्याची असलेली प्रार्थना खरं तर यापूर्वी अवधूत गुप्तेंच्या जय महाराष्ट्र ढाबा बठिंडा या सिनेमात झळकली होती. मात्र अपु-या प्रमोशनमुळे सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकला नव्हता. आता मितवाकडून प्रार्थनाला ब-याच अपेक्षा आहेत. यापूर्वी प्रार्थना छोट्या पडद्यावर गाजलेल्या पवित्र रिश्ता या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकली होती.
प्रार्थना सेल्फी क्रेझी आहे. तिचे हे क्रेझ सोशल नेटवर्किंग साइट्सवर पाहायला मिळते. मितवाच्या प्रमोशनवेळी आपल्या टीमसोबत सेल्फी क्लिक करण्याचा मोह प्रार्थना आवरु शकली नाही. तिने मितवाच्या प्रमोशनवेळी क्लिक केलेली काही खास छायाचित्रे आम्ही वाचकांना दाखवत आहोत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा अत्यंत गोड चेहरा आणि बोलके डोळे असलेल्या प्रार्थनाची खास छायाचित्रे...