आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actress Saie, Amruta\'s Photo Session With Archie\'s Bike At Sairat Music Launch

Party: सैराटच्या म्युझिक लाँचची झाली पार्टी, सई ताम्हणकर, अमृता सुभाषला ‘याडं लागलं’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सैराट सिनेमाच्या टिझरनी गेल्या आठ महिन्यांमध्ये युट्यूबवरून लोकांना वेड लावलंच आहे. आता ह्या सिनेमातली ‘याडं लागलं’, ‘झिंगाट’, ‘आत्ताच बया’, ‘सैराट झालं जी’ ही सर्व गाणी पूर्ण ऐकायला मिळणार आहेत. सिनेमाचं बुधवारी म्युझिक लाँच झालंय.
म्युझिक लाँचला सिनेमाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे, अभिनेता आकाश ठोसर, अभिनेत्री रिंकु राजगुरू आणि सिनेमाचे संगीतकार अजय-अतुल आले होते. ह्यासोबतच सई ताम्हणकर, अमृता सुभाष, महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, दिग्दर्शक सचिन कुंडलकर, हे सेलेब्रिटीही आले होते. त्याचप्रमाणे नागराज मंजुळेंच्या ह्याअगोदरच्या सिनेमातला जब्या म्हणजेच सोमनाथ अवघडेही म्युझिक लाँचला आला होता.
सिनेमाच्या म्युझिक लाँचवेळी सिनेमात आर्ची चालवत असलेली रॉयल एन्फिल्ड ठेवण्यात आली होती. आर्चीच्या ह्या बाइकवर बसून फोटोसेशन करण्याचा मोह अमृता सुभाष आणि सई ताम्हणकर ह्या दोन्ही अभिनेत्रींना झाला.
लॉस एन्जेलिसच्या सोनी स्कोरिंग स्टुडियोमध्ये ह्या सिनेमाच्या संगीताचं रेकॉर्डिंग झालंय. हा पहिला भारतीय सिनेमा आहे, ज्याचं हॉलीवूडच्या ह्या स्टुडियोत रेक़र्डिंग झालंय. ह्या स्टुडियोत ६६ म्युझिशीअन्सच्या ताफ्यासह लाइव्ह सिम्फनी ऑर्केस्ट्रा रेकॉर्ड करणारे पहिले भारतीय संगीतकार असल्याने अजय-अतुलचं सध्या कौतुक होतंय.
नुकत्याच जाहिर झालेल्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सैराटमधल्या अभिनयासाठी रिंकु राजगुरूला राष्ट्रीय पुरस्कार जाहिर झाला आहे. आर्ची आणि परशाची ही लव्हस्टोरी २९ एप्रिलला रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, म्युझिक लाँच झाल्यानंतर कशी झाली पार्टी त्याचे फोटो
(फोटो - स्वप्निल चव्हाण)