आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actress Sonalee Kulkarni In Search Of Her Valentine This Season

सोनाली कुलकर्णी शोधतेय तिचा Valentine, वाचा काय हव्यात त्याच्यात Qualities

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॉट, सेक्सी आणि सुंदर अभिनेत्रींवर फिदा असणा-या देखण्या, श्रीमंत आणि टॅलेन्टेड तरूणांची कमतरता कधीच नसते. आणि मग आपल्यावर फिदा असलेल्या त्यातल्या कोणत्यातरी एकाची व्हॅलेंटाईन व्हायला अभिनेत्रांनाही आवडतं. पण अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचं जरा वेगळं आहे. सोनाली ‘व्हॅलेटाईन डे’ला सिंगल आहे. आणि ती सध्या आपला ‘व्हॅलेटाईन’ शोधतेय.
ह्याविषयी सोनाली divyamarathi.comशी बोलताना म्हणते, “माझ्या बहूतेक मैत्रिणींकडे कोणी ना कोणी जोडीदार आहे. फक्त माझ्याकडेच नाहीये. सध्या माझ्या घरचेही माझ्यासाठी स्थळं पाहतायत. पण ह्याचा अर्थ मी ‘अरेंज मॅरेज’ करायचं नक्की केलंय. असं नाही. पण आयुष्यात सध्या कोणी नाहीये. आणि आयुष्यात कोणी येणं आणि ते आवडणं ह्या गोष्टी ठरवून होत नाहीत. तो ‘मिस्टर राइट’ अरेंज मॅरेजनेही मिळू शकतो आणि प्रेमात पडूनही. आणि मी सध्या प्रेमात पडायला तयार आहे.”
आपल्या जोडीदाराबद्दलच्या अपेक्षा सांगताना सोनाली म्हणते, “लग्न जमवताना लग्नानंतर करीयर सोडणार का? असं विचारणारी लोकं मला आवडतं नाहीत. जर लग्नानंतर तुम्ही तुमचं करीयर सोडणार नाही. तर मी का सोडावं? मी इथंवर अतिशय मेहनत करून आलीय. हिरोइन बनणं माझं स्वप्न होतं. आता माझी स्वप्नं मी कोणासाठीही अर्ध्यावर सोडून का जावीत? त्यामुळे जो माझ्या करीयरचा सन्मान करेल, असाच जोडीदार मला हवाय.”
“तुझं शुटिंग रात्री का असतं? रात्री घराबाहेर जाणं गरजेचं आहे का? तू रात्री आठपर्यंत घरी पोहचली पाहिजेस. किंवा सकाळ-सकाळ तू नाही जायचंस अशी बंधन घालणारा लाइफ-पार्टनर मला नकोय. आमच्या प्रोफेशनमध्ये कामाचे तास आखून दिलेले नसतात. दिवसाचे १२-१२ तास आम्ही काम करतो. बाराचे पंधरा तासही होतात. आम्ही मुंबईबाहेर खूप फिरत असतो. कधी कधी आम्ही दोन-दोन महिने घराबाहेर असतो. तर कधी चक्क दोन महिने घरीही नुसते बसून असतो. ह्यासगळ्या गोष्टींना जी व्यक्ती समजून घेईल. अशीच व्यक्ती माझ्या आयुष्याचा जोडीदार बनू शकते.”
ती पूढे म्हणते,“हे असं शेड्युल एडजेस्ट करणं खूप कठीण असलं तरीही गरजेचं आहे. आणि हे असेल ना, तर मग तो पैसा किती कमवतो, त्याचं शिक्षण किती आणि तो किती देखणा आहे. ह्यासगळ्या गोष्टी दुय्यम होतात. माझ्या आयुष्यात, सुख-दु:खात, त्याने मला समजून घेणं गरजेचं आहे.”
पुढील स्लाइडमध्ये वाचा, सोनाली सांगतेय, नव-यात तिला हवी असलेली महत्वाची Quality