आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'कच्चा लिंबू\' फेम सोनालीचे 20 वर्षांपूर्वीचे हे PHOTOSHOOT पाहिलंय का तुम्ही!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेन्मेंट डेस्कः गौतम राजाध्यक्ष ‘स्टार फोटोग्राफर’ म्हणून प्रसिद्ध होते. अनेक कलाकारांनी आपले ‘फोटोसेशन’ त्यांच्याकडून करवून घेतले. नुकत्याच रिलीज झालेल्या 'कच्चा लिंबू' या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिनेदेखील करिअरच्या सुरुवातीच्या काळात गौतम राजाध्यक्ष यांच्याकडून फोटोसेशन करुन घेतले होते. या फोटोशूटमध्ये सोनाली व्हाइट आणि ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये दिसतेय. काही फोटोजमध्ये तिने केस मोकळे सोडले आहेत. 

विशेष म्हणजे गौतम राजाध्यक्ष लेखकसुद्धा होते. त्यांनी 'बेखुदी' आणि 'अंजाम' या हिंदी चित्रपटांसोबतच संजय सुरकर दिग्दर्शित 'सखी' या चित्रपटाची कथा लिहिली होती. 'सखी' या चित्रपटात सोनाली कुलकर्णीने महत्त्वाची भूमिका साकारली होती. गौतम राजाध्यक्ष यांचे 13 सप्टेंबर 2011 रोजी हृद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले.  

या पॅकेजमध्ये तुम्हाला सोनालीची दिवंगत गौतम राजाध्यक्ष यांनी त्यांच्या कॅमे-यात टिपलेली छायाचित्रे बघता येतील... शिवाय सोनालीच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळातील छायाचित्रांचाही समावेश यात आहे.. पाहुयात, 20 वर्षांपूर्वी कशी दिसत होती सोनाली...     
 
(फोटो साभार - सोनाली कुलकर्णी ऑफिशिअल वेबसाइट)
बातम्या आणखी आहेत...