आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेश्येच्या भूमिकेत सोनाली, ‘शटर’मध्ये दिसणार Non- Glamorous लूकमध्ये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोनाली कुलकर्णीचे शटर मधील फोटो
मल्याळम चित्रपटाचा मराठी रिमेक असलेला ‘शटर’ हा मराठी सिनेमा येत्या शुक्रवारी रिलीज होत आहे. सिलिकॉन मिडिया ट्रेंड्स अॅड फिल्म मेकर्स प्रा. लि. यांची निर्मिती असलेल्या व्ही. के. प्रकाश दिग्दर्शित ‘शटर’ या सिनेमात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी एका वेश्येच्या भूमिकेत दिसणार आहे.
सोनाली अशा पध्दतीने वेश्येची भूमिका प्रथमच साकारतेय. आपल्या भूमिकेविषयी सांगताना सोनाली म्हणते, “ही वेश्या असली, तरीही आत्तापर्यंत आपण हिंदी-मराठी चित्रपटांमधून दिसलेल्या भडक रंगाचे कपडे घालणा-या आणि लाउड आणि मेलोड्रॅमॅटिक बोलणा-या ग्लॅमरस वेश्येसारखी ही वेश्या नाही. कमी वयात आलेल्या समस्यांमूळे वेश्या बनलेली ही मुलगी, आपलं आयुष्य जसं आहे, तसंच स्विकारणारी आहे.”
आपल्या भूमिकेचे वेगळेपण सांगताना सोनाली भरभरून बोलू लागते, “मला दिग्दर्शकानी संहितेविषयीच्या वाचनातच सांगितलं होतं, की जेव्हा ही वेश्या पहिल्यांदा चित्रपटात दिसते, तेव्हा ती बसस्टॉपवर उभी असते. त्यावेळेस ही वेश्या आहे की नाही, याबद्दल दोनदा विचार करावा असं हीच व्यक्तिमत्व आणि राहणीमान हवं. ती वेश्या असून सुध्दा साधी, सरळ, आणि निरागस वाटणं आवश्यक होतं. त्यामुळेच जर तुम्ही चित्रपटात मला पाहाल, तर अगदी दिडशे-दोनशे रूपयाची साडी आणि अगदी साध्या चपला घातलेल्या मी दिसतील. मला चित्रपटात नॉन-ग्लॅमरस दिसणं आवश्यक असल्याने अगदी दहा मिनीटांत मी तयार व्हायचे. जेव्हा चित्रपटात सचिन खेडेकर आणि मी एका दुकानात शटरच्या आतमध्ये अडकतो. त्यानंतर तर मी केसही विंचरलेले नाहीत. साडीही नीट केलेली नाही. विस्कटलेली आणि खाली बसल्याने घाणीत खराब झालेली माझी साडी तुम्हांला दिसेल. आणि हाच खरेपणा तुम्हांला आवडून जाईल.”
पूढे वाचा, सोनाली सांगतेय, तिच्या आणि सचिन खेडेकरांच्या रिलेशनशिपबद्दल