आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सो कूल' सोनाली @41: चंद्रकांत कुलकर्णीसोबत घटस्फोटानंतर थाटला दुसरा संसार, जाणून घ्या FACTS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पती नचिकेत आणि मुलगी कावेरीसोबत सोनाली कुलकर्णी - Divya Marathi
पती नचिकेत आणि मुलगी कावेरीसोबत सोनाली कुलकर्णी

सोनाली कुलकर्णी हे नाव सर्वांच्याच परिचयाचे आहे. 'सो कूल' या नावानेही तिला ओळखले जाते. सो कूल सोनालीचा आज वाढदिवस असून तिने वयाची 41 वर्षे पूर्ण केली आहेत. 3 नोव्हेंबर 1974 रोजी जन्मलेली सोनाली मुळची पुण्याची आहे. गिरीश कर्नाड दिग्दर्शित 'चेलुवी' या कन्नड सिनेमाद्वारे आपल्या करिअरला सुरुवात करणा-या सोनालीने केवळ देशांतच नव्हे, तर परदेशातही आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. 'फुओको दी सु' या इटॅलियन सिनेमातील भूमिकेसाठी सोनालीला 2006 साली मिलन फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुरस्कार मिळाला.

गिरीश कर्नाड दिग्दर्शित "चेलुवी' या सिनेमात काम करण्यापूर्वी सोनाली पुण्यातील प्रेक्षकांना तिच्या प्रायोगिक नाटकांमुळे व त्यांच्या 'समन्वय' या नाट्यसंस्थेमुळे माहीत होती. मात्र 'चेलुवी'मुळे तिचे नाव संपूर्ण देशभर झाले. या सिनेमावेळी तिचे महाविद्यालयीन शिक्षण सुरू होते. 1992 मध्ये आलेल्या या सिनेमाने राष्ट्रीय पारितोषिक मिळवले होते. इतकंच नाही, तर दिल्ली, लंडन, कान्स फेस्टिव्हलमध्ये हा सिनेमा दाखविला गेला होता.
या सिनेमाला मिळालेल्या यशानंतर सोनालीने कधीही मागे वळून पाहिले नाही. मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड, तामिळ, इटालियन आणि इंग्रजी सिनेमांत तिने काम केले. कैरी, घराबाहेर, देवराई, दोघी, मुक्ता, सखी, अगं बाई अरेच्चा 2 हे तिचे गाजलेले निवडक मराठी सिनेमे आहेत. तर दिल चाहता है, डरना जरुरी है, दिल विल प्यार व्यार, प्यार तुने क्या किया, सिंघम या हिंदी सिनेमांमध्येही तिने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.
सोनालीला लिखाणाचीसुद्धा आवड आहे. एका मराठी दैनिकासाठी ती 'सो कूल' नावाने कॉलम लिहायची. नाना पाटेकर यांनीही सोनालीच्या लिखाणाचे कौतुक केले होते. मराठी चित्रपटसृष्टीत सोनालीला 'सो कूल' नावानेही ओळखले जाते.
थाटला दुसरा संसार...
सोनालीला खासगी आयुष्यात अनेक चढउतार बघायला मिळाले. दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्याबरोबर सोनालीचे लग्न झाले होते. मात्र फार काळ त्यांचे नाते टिकू शकले नाही आणि त्यांनी घटस्फोट घेतला. 2010 मध्ये सोनालीने नचिकेत पंतवैद्यबरोबर आपला दुसरा संसार थाटला. नचिकेत फॉक्स टीव्हीमध्ये एम.डी. पदावर कार्यरत आहेत. नचिकेतचेसुद्धा हे दुसरे लग्न आहे. सोनाली आणि नचिकेत चार वर्षांच्या मुलीचे आईवडील आहेत.
सोनालीच्या वाढदिवसाचे औैचित्य साधत आम्ही तुम्हाला तिची खास छायाचित्रे दाखवत आहोत.. प्रसिद्ध फोटोग्राफर गौतम राजाध्यक्ष यांनी सोनालीच्या करिअरच्या सुरुवातीला काढलेल्या छायाचित्रांचाही यामध्ये समावेश आहे...