आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'मस्तानी\'ची खास मैत्रीण ख-या आयुष्यात अडकतेय लग्नगाठीत, अगदी साधेपणाने होणार लग्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘आभाळमाया’ या लोकप्रिय मालिकेतली चिंगी आजही सगळ्यांना आठवते. गोड चेहरा आणि मोठ्या माणसासारखे बोलणे हे त्या चिंगीचे वैशिष्ट्य होते. या चिंगीने म्हणजेच अभिनेत्री स्वरांगी मराठेने मोठी झेप घेत ‘बाजीराव मस्तानी’मध्ये दीपिकाच्या म्हणजे मस्तानीच्या मैत्रिणीची भूमिका साकारली. एका मुसलमान मुलीची भूमिका स्वरांगीने 'बाजीराव मस्तानी' या सिनेमात साकारली. हीच क्यूट स्वरांगी आता खासगी आयुष्यात बोहल्यावर चढतेय. प्रसिद्ध शास्त्रीय गायक दिवंगत पं. राम मराठे यांची नात आणि मुकुंद-केतकी मराठे यांची कन्या स्वरांगी ठाण्याच्या निखिल काळेसोबत येत्या फेब्रुवारीत विवाहबद्ध होणारेय.
मात्र भव्यदिव्य लग्न न करता अगदी साध्या पद्धतीने स्वरांगी निखिलसोबत लग्नगाठीत अडकणारेय. भव्य विवाह सोहळा न करता शास्त्रोक्त व साधेपणाने विवाह करण्याचा निर्णय स्वरांगी आणि निखिलसोबतच त्यांच्या कुटुंबीयांनी घेतला आहे. लग्नासाठी खर्च होणारी रक्कम वनवासी कल्याण आश्रम व सांगीतिक संस्थेला उलब्ध करुन देण्याचे त्यांनी ठरवले आहे. सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून मराठे आणि काळे कुटुंबीयांनी विवाहसोहळ्याचे निमंत्रणही दिलेले नाही. खरं तर सेलिब्रिटींची लग्ने म्हटली, की भव्यदिव्यपणा लक्ष वेधून घेत असतो. मात्र स्वरांगी आणि निखिलने अगदी साधेपणाने विवाह करण्याचा निर्णय घेऊन आदर्श घालून दिलाय.
पुढील स्लाईडमध्ये पाहा, स्वरांगी आणि निखिलच्या लग्नाच्या निमित्ताने मुकुंद मराठे आणि केतकी मराठे यांनी प्रकाशित केलेली आदर्श पत्रिका... आणि सोबतच जाणून घ्या स्वरांगीविषयीच्या खास गोष्टी...