आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गायक आनंद शिंदेंचा मुलगा आणि आदर्श शिंदेचा भाऊ उत्कर्ष चढला बोहल्यावर, बघा Wedding Pics

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉ. उत्कर्ष शिंदेच्या लग्नातील खास क्षण... - Divya Marathi
डॉ. उत्कर्ष शिंदेच्या लग्नातील खास क्षण...
मुंबईः प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचा मुलगा आणि आदर्श शिंदेचा थोरला भाऊ डॉ. उत्कर्ष शिंदे अलीकडेच लग्नाच्या बेडीत अडकला. स्वप्नजा नरवडे हे उत्कर्षच्या पत्नीचे नाव असून तीदेखील एक डॉक्टर आहे. 30 मे रोजी मुंबईत शाही थाटात उत्कर्ष आणि स्वप्नजा बोहल्यावर चढले.
डॉक्टर, गायक आणि संगीतकार आहे उत्कर्ष
गायक आनंद शिंदे यांना हर्षद, उत्कर्ष आणि आदर्श ही तीन मुले आहेत. आदर्श शिंदे मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायक असल्याचे आपणा सर्वांनाच ठाऊक आहे. उत्कर्ष एक डॉक्टर असण्यासोबतच त्यालासुद्धा आपल्या वडिलांकडून गायनाचा वारसा मिळाला आहे. 'प्रियतमा' या सिनेमात उत्कर्ष आणि आदर्श यांनी गाणी गायली आहेत. शिवाय 'पॉवर' या सिनेमासाठी उत्कर्षने संगीतकार म्हणून भूमिका बजावली. 'शिंदेशाहीचा भीमशाही' या कार्यक्रमाचा उत्कृर्ष गायक, संगीतकार आणि लेखक आहे. 'फुंकर' या मराठी सिनेमालासुद्धा उत्कर्षने संगीत दिले आहे.

उत्कर्ष आणि स्वप्नजा यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा द्यायला मराठी इंडस्ट्रीतील त्याचे फ्रेंड्स आवर्जुन हजर होते. संगीतकार अमितराज, अभिनेत्री मेघा घाडगे यांनी या नवदाम्पत्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, उत्कर्ष आणि स्वप्नजा यांच्या लग्नाची खास छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...