आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘नांदा सौख्य भरे’ मालिकेला मिळू दे यश, निर्माते आदेश बांदेकर यांची सत्यनारायणाकडे प्रार्थना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निर्माते आदेश बांदेकर यांची सत्यनारायण पूजा आणि मालिकेतल्या सासू-सूनेचा फोटो
झी मराठीची नवी मालिका 'नांदा सौख्य भरे' ही मालिका २० जुलैपासून सुरू होतेय. आणि मालिकेचे निर्माते आदेश बांदेकर यांनी आपल्या ह्या नव्या मालिकेसाठी नुकतीच सत्यनारायणाची पुजा करून मालिकेच्या यशाची कामना केलीय. झी मराठीवर 'होम मिनिस्टर'सारखा वेगळा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता त्याच वाहिनीसोबत निर्माता म्हणून आदेश बांदेकरांची ही पहिली मालिका आहे.
या संदर्भात पुजा केल्यानंतर आदेश बांदेकर म्हणतात,”सासू-सूनेवर अनेक मालिका सध्या वेगवेगळ्या वाहिन्यांवर सुरू आहेत. सासू-सून म्हटलं की भांड्याला भांड लागणं, हे सहाजिकच आहे, असं म्हटलं जातं. पण जेव्हा जेव्हा मी महाराष्ट्रभर होम मिनिस्टर शोसाठी फिरलो, तेव्हा मला एक वेगळा अनुभव आला. ब-याचदा एखादी बाई, सासू झाल्यावरही सकारात्मक दृष्टीकोणातून बदललेली, सूनेच्या सान्निध्यात मॉडर्न झालेली, आपल्या सूनेवर मुलीसारखी प्रेम करणारी, आणि आयुष्यात काही शिकायचं राहिलं असल्यास सून आल्यावर त्या इच्छा पूर्ण करणारी अशीही मी पाहिलीय. आणि कुठेतरी तेच अनुभव तुम्हांला या मालिका रूपातून मी घेऊन आलोय. आपल्याच घरातल्या काही गोष्टी सासू-सूना यातून पाहतील.”
होम मिनिस्टरच्या आठवणी सांगताना बांदेकर पूढे म्हणतात,”सूनेच्या घरात येण्यामुळे आजपर्यंत साडीत वावरलेली सासू, पहिल्यांदा जिन्समध्ये मी पाहिलीय. काल पर्यंत मॉलमध्ये न गेलेली सासू, सुनेच्यासोबत मॉलमध्ये मस्त शॉपिंग करताना पाहिलीय. थोडक्यात सांगायचं तर, यातली सून ही सासूबाईंच्या डोक्यावर मि-या वाटणार नाही, तर सासूबाईंना नव्या जमान्यासोबत मिक्सरमध्ये मि-या कशा वाटता येतील ते शिकवेल. सासू-सुनेचं सकारात्मक नातं, त्यांच्या नात्यातला ओलावा आम्ही जपण्याचा प्रयत्न केलाय.”
सासू-सुनेच्या नाजुक आणि हळूवार नात्याविषयी भाष्य करणा-या या मालिकेत अभिनेत्री सुहास परांजपे सासूच्या भुमिकेत दिसतील. तर अभिनेत्री ऋतुजा बागवे सुनेच्या भुमिकेत दिसणार आहे. तर या सुनबाईंचा नवरा आहे, अभिनेता चिन्मय उदगीरकर.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, 'नांदा सौख्य भरे' मालिकेचे फोटो