आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॅण्डसम आदिनाथ आणि ग्लॅमरस तेजस्विनीची नवी मालिका \'100 DAYS\', वाचा काय आहे स्टोरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठी मालिकांच्या विश्वात झी मराठीने आजवर अनेक यशस्वी प्रयोग केले. कधी हे प्रयोग कथेमध्ये करण्यात आले, कधी कथाबाह्य कार्यक्रमामध्ये तर कधी प्रसारणाच्या वेळेमध्ये. सायंकाळी ७ ते रात्री ९.३० या वेळेत चालणारा प्राईम टाइम पुढे नेत झी मराठीने १०.३० या वेळेत नवे कार्यक्रम सुरु केले आणि प्रेक्षकांनी त्याला भरभरुन प्रतिसाद दिला. आधी ‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेतून मैत्रीची अनोखी गोष्ट प्रेक्षकांना बघायला मिळाली तर ‘रात्रीस खेळ चाले’ मधून एका रहस्यमय उत्कंठावर्धक गोष्टीने आणि नाईक कुटुंबाने प्रेक्षकांची मने जिंकली. विशेष म्हणजे केवळ शहरीच नाही तर निमशहरी आणि ग्रामीण भागातील प्रेक्षकही या नव्या वेळेशी आणि नव्या मालिकेशी जोडला गेला. पहिल्या भागापासून सुरु झालेल्या 'रात्रीस खेळ चाले' मालिकेने शेवटच्या भागापर्यंत रहस्याची उत्कंठा कायम ठेवली आता याच वेळेत 'हंड्रेड डेज' ही आणखी एक रहस्यमय मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे ज्यातून रहस्याचा एक नवा थरार बघायला मिळणार आहे.
या मालिकेचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ही मालिका शंभर भागांचीच आहे. शंभर दिवसात उलगडणा-या रहस्याचा उत्कंठावर्धक प्रवास या मालिकेतून बघायला मिळणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीमधील दोन लोकप्रिय कलाकार म्हणजेच तेजस्विनी पंडित आणि आदिनाथ कोठारे या मालिकेत मुख्य भूमिकेत बघायला मिळणार आहेत. याशिवाय मालिकेत रमेश भाटकर, अर्चना निपाणकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

कधी कधी एखादी व्यक्ती एखादं रहस्य स्वतःजवळ बाळगून असते.. आणि कधी कधी एखादी व्यक्ती स्वतःच एक रहस्य असते.. अशा व्यक्तीच्या सहवासात राहूनही तिच्या मनात नेमकं काय चाललंय हे कळत नाही आणि ती कधी कुठला डाव खेळेल ते सुद्धा सांगता येत नाही.. अशाच एका रहस्याची, त्या रहस्यामागे असणा-या व्यक्तीची आणि त्या रहस्याचा शोध घेणा-या प्रामाणिक पोलिस अधिका-याची गोष्ट प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे झी मराठीच्या आगामी ‘हंड्रेड डेज’ या मालिकेतून.

पुढे वाचा, काय आहे मालिकेचे कथानक आणि सोबतच बघा आदिनाथ आणि तेजस्विनीच्या फोटोशूटची खास झलक...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...