आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Adinath Kothare Wants To Portray Bajirao, Check Who Wants To Become Kashibai

आदिनाथला बनायचंय बाजीराव, तर दिप्ती केतकरला काशीबाई, वाचा, इतर Celebsच्या इच्छा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संजय लीला भन्सालीच्या ‘बाजीराव मस्तानी’वर चित्रपट रिलीज होण्याअगोदर बरीच चर्चा झालीय. ह्या चित्रपटाच्या प्रोमो, टिझर्समूळे सिनेमाविषयी भरपूर उत्सुकता चाळवली गेलीय. विस्मृतीत गेलेल्या मराठी वीरपुरूष बाजीरावांना ह्या निमीत्ताने पून्हा एकदा ग्लोबल ओळख मिळतेय.
नेमकं ह्याचवेळी ‘झी मराठी’ आणि ‘कलर्स मराठी’वर अनुक्रमे ‘जय मल्हार’ आणि ‘गणपती बाप्पा मोरया’ हे पौराणिक डेली सोपही चालू आहेत. त्यामूळे एकूणच सध्या असलेल्या पौराणिक आणि ऐतिहासिक मालिका-चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती लक्षात घेता काही मराठी कलाकारांना कोणत्या पौराणिक आणि ऐतिहासिक व्यक्तिरेखेला तुम्हांला सिनेमा किंवा मालिकेत साकारायला आवडेल, असं divyamarathi.comने विचारलं, वाचा त्यावर सेलेब्सने दिलेल्या ह्या प्रितिक्रिया –
सचिन खेडेकर –
पौराणिक फिल्म्स आपल्याकडे कित्येक वर्षात झाल्या नाहीत. आणि मी एकही पौराणिक फिल्म केली नाही. पण मी हिंदीत ‘शामरंग’ नावाचं नाटक केलं होतं. ज्यात कृष्णाची भूमिका केली होती. मराठीत असं काही झाल्यास कृष्ण साकारायला नक्की आवडेल. पण त्याचप्रमाणे इरावर्ती कर्वेंच्या युगांत कादंबरीमधली महाभारतातली कोणतीही पात्र जर एखाद्या सिनेमात रंगवायला मिळली, तर मला खूप आवडेल.
मृणाल दुसानिस –
मला इतिहासातल्या वीर-स्त्रियांविषयी खूप आकर्षण आहे. अहिल्याबाई होळकर, राणी लक्ष्मीबाई ह्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी एक आकर्षण नेहमीच राहिलंय. त्यांना साकारायला नक्कीच आवडेल.
पौराणिक व्यक्तिमेत्वांपैकी पार्वती मला खूप आवडते. तिच्यातलं मांगल्य मला खूप भावतं.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, कोणाल बनायचंय छत्रपती संभाजी, कोणाला व्हायचंय दूर्गा, आणि कोण होणार परशुराम