एंटरटेन्मेंट डेस्कः मराठी फिल्म्स, टेलिव्हिजन आणि रंगभूमीवर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे आदिती सारंगधर. 'दामिनी', 'वादळवाट', 'लक्ष्य' या मालिकांमधून ती घराघरांत पोहोचली. पाच वर्षांपूर्वी सुहास रेवांडकर यांच्यासोबत आदिती विवाहबद्ध झाली. लग्नानंतर चार वर्षांनी आदिती आणि सुहास यांच्या मुलाचा जन्म झाला. अरीन हे त्यांच्या गोंडस बाळाचे नाव आहे.
मॅगझिनच्या कव्हरपेजवर बाळासोबत झळकली आदिती...
'मदर अँड बेबी' या मॅगझिनच्या जुलै महिन्याच्या अंकावर आदिती चिमुकल्या अरीनसोबत झळकली आहे. या मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत आदितीने सांगितले, "सुहाससोबत माझे लव्ह मॅरेज आहे. लग्नाच्या चार वर्षांनी आम्ही बाळाचा विचार केला. मी 35 वर्षांची तर सुहास 43 वर्षांचा आहे. त्यामुळे या वयात प्रेग्नेंसीचा विचार केल्याने सर्वकाही सुरळीत पार पडले ना, अशी भीती मनात होती. पण नशिबाने सर्वकाही सुरळीत पार पडले."
या मॅगझिनसाठी आदितीने आपल्या चिमुकल्यासोबत खास फोटोसेशनसुद्धा केले आहे. या आई मुलाच्या फोटोजना सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळत आहे. सोशल मीडियावर या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
पाहुयात, चिमुकल्या अरीनसोबतचे आदितीचे खास फोटोज...