आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After 16 Years Daily Soap Abhalmaya's Makers Planning For It's Sequel

लवकरच येणार आभाळमाया-२, सोळा वर्षपूर्तीनंतर आता मालिकेचा sequel बनवायचा निर्मात्यांचा मानस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अच्युत वझे आणि सुबोध गाडगीळ निर्मित, विनय आपटे दिग्दर्शित, ‘आभाळमाया’ ही मालिका १९९९ ला टीव्हीवर सुरू झाली. मराठीतल्या ह्या पहिल्या डेलीसोपला प्रेक्षकांचं अमाप प्रेम मिळालं. नुकतीच मालिकेने १६ वर्ष पूर्ण केलीयत. ह्यानिमीत्ताने जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आयोजित एका छोटेखानी पार्टीत निर्मात्यांनी हा आपला मानस बोलून दाखवला.
निर्माते अच्युत वझे ह्याविषयी दिव्य मराठीला अधिक माहिती देताना म्हणाले, “१६ वर्षांनी पून्हा एकदा आठवणी जागवताना, सर्वच कलावंतांनी पून्हा एकदा मालिका सुरू करण्याचा आग्रह केला. गेली १४ वर्ष मी जिथे कुठे जायचो, तिथे मला लोकं, आभाळमायाचा सिक्वल बनवा असा आग्रह धरायचीच. पण आता कलावंतांचं म्हणणं मी मनावर घेतलंय. आता सिक्वल बनवताना फक्त जुन्यांपैकी कोण काम करू इच्छितंय. आणि कोणाची व्यक्तिरेखा जिवंत आहे, कोणाची त्या मालिकेत वारलेली दाखवलीय. १६ वर्षांनी जोशींची पिढी किती मोठी झाली हे दाखवायची. ह्याबाबींचा बारकाईने विचार करावा लागणार. बाकी कथानकाविषयी विचार करायला तर मी सुरूवातच केलीय. आता सहा महिन्यांमध्ये मालिका आकार घ्यायला हवी. झी मराठी मालिका तयार झाल्यास ती दाखवायला कधीच नाही म्हणणार नाही ह्याची मला पूर्ण खात्री आहे. कारण जशी आज कलर्ससाठी बालिका बधू मालिका आहे. तशीच झीमराठीसाठी आभाळमाया ही पहिली आयकॉनिक मालिका आहे. ह्या मालिकेनेच त्यावेळी अल्फा मराठी नाव असलेली झीमराठी नावारूपाला आली होती.”
निर्माते सुबोध गाडगीळ सांगतात, “ही मालिका अगोदर दूरदर्शनसाठी बनवण्यात आली होती. पायलट पास झाला. मालिका कधी दाखवणार ह्याचा स्लॉटही ठरला होता. पण काही कारणाने ती दाखवली गेली नाही. आम्ही १८ भाग चित्रीत करून तयार होतो. काय करायचं हा यक्षप्रश्न समोर उपस्थित असतानाच नवीनच लाँच होणा-या अल्फा मराठीच्या लोकांना मालिका दाखवली. आणि ती त्यांना पसंतही पडली. आणि इतिहास घडला.”
सुकन्या कुलकर्णी मालिकेविषयीची आठवण जागवताना म्हणतात, “ह्या मालिकेत एक महत्वाचा सीन आहे. शरदच्या एक्स्ट्रा-मॅरिटल अफेअरबद्दल कळल्याबद्दल सुधा-शरदचं भांडणं होतं. आणि शरद जोशी घराबाहेर पडतो. त्या सीननंतर आठ दिवस अख्ख युनिट अस्वस्थ होतं. त्यावेळी शरदची पत्नी सेटवर आली होती. त्यांना दोघांना तिथूनच पूढे एका लग्नाला जायचं होतं. पण त्या सीनच्या चित्रीकरणानंतर अस्वस्थ होऊन ती लग्नाला तर गेली नाहीच. पण रात्री उशीरा उद्युग्न मनस्थितीत तिला झोप लागेना. शेवटी मी तिच्याशी फोनवरून बोलले तेव्हा ती थोडी ठिक झाली. आभाळमायाशी माझं एवढं जवळचं नातं आहे, की, आभाळमायासाठी घातलेल्या साड्या मी घरी घेऊन गेले होते. आणि आजही त्या मी जपून ठेवल्यात.”
पुढील स्लाइडमध्ये पाहा, आभाळमाया मालिकेचे फोटो