आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After 23 Years Priya Berde Is Doing Double Role,. But This Time It\'s Not Film But For TV

23 वर्षांनी प्रिया बेर्डे पून्हा Double Roleमध्ये, शर्मिला-उर्मिला बनून देणार परीला Double Trouble?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘तू जीवाला गुंतवावे’ ह्या मालिकेनंतर आता पून्हा एकदा प्रिया बेर्डे स्टार प्रवाहच्याच ‘प्रीती परी तुजवरी’ मध्ये दिसणार आहेत. ह्या मालिकेचं वैशिष्ठ्य आहे, की ह्यात प्रिया बेर्डेंचा डबल रोल आहे. शर्मिला आणि उर्मिला ह्या जुळ्या बहिणींच्या भूमिकेत त्या आहेत.
साहिलची आई आहे शर्मिला, तर त्याची मावशी असेल उर्मिला. त्यामूळे आता परीला एक नाही तर दोन-दोन सासू असणार आहेत. त्यामूळे परीच्या ट्रबलमध्ये डबल वाढ होणार का असं विचारल्यावर मालिकेचे दिग्दर्शक उमेश नामजोशी म्हणतात,”परीलाच नाही तर अख्या घरा-दारालाच त्रास देणारी उर्मिला आहे. शर्मिला मात्र साधी सरळ आहे. त्यामूळे सख्या सासूकडून सासूरवास होण्याची शक्यता नाही. शर्मिलाचा भारतातला व्यवसाय तसंच साहिललाही सांभाळण्याचं काम उर्मिलाने केलंय. त्यामूळे साहिलसाठी आईपेक्षा जास्त जवळची त्याची मावशी उर्मिला आहे. उर्मिला खलनायिका नसली तरीही, गोड बोलून आपल्या बहिणीकडून आपल्याला हवं ते काढून घेणारी, तिला ब-याचदा लुबाडणारी,आणि तिच्या प्रॉपर्टीवर डोळा असणारी उर्मिला आहे. शर्मिला आपल्या बहिणीचं सगळं ऐकत असल्याने तिच्यात आणि उर्मिलात कधी खटके उडालेले नाहीत. पण आता उर्मिलाच्यासमोर परी नावाचं एक आव्हान उभं ठाकलंय. जर साहिलने बायकोचं ऐकलं, तर उर्मिला आणि परीमध्ये नाट्य घडून येताना दिसेल.”
येत्या सोमवारी प्रिया बेर्डेंची मालिकेत एन्ट्री होताना दिसणार आहे. जुळ्या भावंडांना एकत्र दाखवणं, VFXमूळे सहजशक्य झालं असलं, तरीही डेली सोपच्या गडबडीत हे दिग्दर्शक आणि कलाकारांसाठी खूपच धावपळीचं ठरतं. ह्याविषयी दिग्दर्शक उमेश नामजोशी सांगतात, “ज्या ज्यावेळी उर्मिला आणि शर्मिला एकत्र एका सीनमध्ये असेल तेव्हा आमची खरी तारांबळ उडणार. कारण आम्हांला रोजच्या एपिसोडसाठी खूप धावपळ करावी लागते. आता ह्या डबलरोलमूळे एक सीन आम्हांला दोनदा चित्रीत करावा लागणार. डेलीसोपमध्ये ह्यामूळे डबलरोल करणारा कलाकार, दिग्दर्शक आणि VFXटीम सगळ्यांवरच भार पडतो.."
पुढच्या स्लाइडमध्ये वाचा, प्रिया बेर्डे सांगतायत त्यांच्या २३ वर्षांनंतरच्या डबलरोल विषयी