आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • After 28 Years Anand Shinde Again Sings Double Meaning Song On \'Popat\'

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘नवीन पोपट’नंतर २८ वर्षांनी पून्हा आनंद शिंदेंचं ‘पोपटा’वर चावट गाणं,वाचा का उठवलं आदर्शला हळदीवरून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आनंद शिंदेंच चावट गाणं 'पोपट पिसाटला'
२८ वर्षांपूर्वींच आनंद शिंदेंनी गायलेलं ‘जवा नवीन पोपट हा’ आजही लोकप्रिय गाणं आहे. त्या गाण्याची लोकप्रियता अजून ओसरली नसताना पून्हा एकदा गायक आनंद शिंदे ह्यांनी आगामी ‘शिनमा’ ह्या चित्रपटात ‘तुझी चिमणी उडाली फुर्र फुर्र माझा पोपट पिसाटला..’ हे व्दयर्थी गाणं गायलं आहे.
विशेष म्हणजे आनंद शिंदें ह्यांचे नवीन पोपट गाणं त्यांचा मुलगा आणि सध्याचा आघाडीचा गायक आदर्श शिंदेंच्या जन्माच्या एक वर्ष अगोदर आलं होतं. तर आता ‘पोपट पिसाटला’ हे गाणं आदर्शच्या लग्नानंतर आलंय.
आदर्श शिंदे ह्या गाण्याबद्दल सांगतो, “ बाबांचं ‘नवीन पोपट’गाणं मी लहानपणापासून ऐकलंय. माझी गाण्याची सुरूवात त्यांच्या पोपट गाण्याने झालीय. माझ्या प्रत्येक गाण्याच्या प्रोग्रॅममध्ये मी हे गाणं म्हटलंय. आणि आता पून्हा एकदा ‘पोपट’वरचं त्यांनी गाणं गायलंय. ‘पोपट’वर कोणतंही गाणं येवो, ते तर बाबांनीच गायलं पाहिजे, असं समीकरण झालंय. मी सूध्दा ‘शिनमा’ फिल्ममध्ये गाणं गायलंय. पण आता बाबांच्या गाण्यानंतर ‘अरे, आपलं गाणं कोण ऐकणार’ असं वाटू लागलंय. एवढं बाबांचं गाणं फक्कड झालंय.”
गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या आठवणींबद्दल आदर्श सांगतो,” रेकॉर्डिंग घराच्या शेजारीच असलेल्या स्टुडियोत होतं. आणि बाबांनी गाणं रेकॉर्ड करत असताना फोन केला आणि ताबडतोब बोलावलं. तेव्हा घरी बॉक्सरमध्ये बसलो होतो, तसाच उठून त्यांचं रेकॉर्डिंग ऐकायला गेलो.”
मुलांना आपल्या कामगिरीवर वड़िलांची कौतुकाची थाप हवी असते. तसंच ब-याचदा वडिलांनाही आपल्या कामावर मुलांची दाद हवी असते, म्हणूनच आपलं गाणं पहिलं आदर्शनेच ऐकावं, असं आनंद शिंदेंना वाटलं. आणि त्यांनी पहिलं गाणं मुलालाच ऐकवलं.
“रेकॉर्डिंगवेळी गाण्याची धून ऐकताच मला लक्षात आलं की हे गाणं तर सुपरहिट आहे. आणि गाणं गाताना वाटलं, आता कोणाची तरी जवळच्या माणसाची ह्याला दाद हवी आहे, चटकन आदर्शला फोन लावला. खरं तर आदर्शला, त्यादिवशी हळद लावली होती. पण तो तसाच उठला आणि आला. आणि त्याची दादच सांगून गेली, की आता हे गाणं प्रत्येक सण-समारंभाला गल्ली-बोळात वाजणार आहे.”
पुढील स्लाइडमध्ये पाहा. आनंद शिंदें आणि कविता निकमनी गायलेलं पोपट पिसाटला गाणं गाणं