सतीश राजवाडे दिग्दर्शित स्वप्निल जोशी आणि मुक्ता बर्वे स्टारर ‘मुंबई पूणे मुंबई’ आणि ‘मुंबई पुणे मुंबई२’ दोन्ही सिनेमे हिट झाल्यावर आता ‘मुंबई पुणे मुंबई३’ सूध्दा
आपल्या भेटीस येणार आहे. मंगळवारी झालेल्या MPM2च्या सक्सेस पार्टीला ह्या नव्या सिनेमाची घोषणा सिनेमाच्या निर्माते-दिग्दर्शकांनी केली.
निर्माते अमीत भानुशाली ह्याविषयी म्हणाले, “MPM2 करताना सतीश राजवाडे आणि संपूर्ण टीमवर आम्ही ठेवलेला विश्वास बॉक्स ऑफिस कलेक्शनवरून सर्वांना दिसून आलाच आहे. सात दिवसात सात करोडचा बिझनेस करणारी ह्या फिल्मच्या सक्सेसनंतर अर्थातच आमचे ऋणानुबंध असेच कायम ठेवण्यासाठी आम्ही सतीशसोबत अजून एक फिल्म करण्याचा निर्णय घेतला.”
मुंबई पुणे मुंबई२च्या सर्वाधिक आनंदी चेहरा होता, तो दिग्दर्शक सतीश राजवाडेंचा. आपल्या MPM2च्या यशाबद्दल आणि नव्या फिल्मविषयी सांगिताना सतीश म्हणाले,“मला नेहमी वाटायचं की, माझ्या सूध्दा सिनेमाची सक्सेस पार्टी व्हावी. म्हणूनच MPM२च्या सक्सेस पार्टीवेळी मी प्रचंड खुशीत आहे. माझ्या डोक्यात MPM सिनेमाचे पाच सिनेमे करणे आहे. मात्र सध्या तरी तिसरी फिल्म बनवण्याचा विचार माझा आणि निर्मात्यांचा आहे. आता मुक्ता आणि स्वप्निल हे अर्थातच त्याही सिनेमात असणार, त्यांची कुटूंबही आपल्याला आता माहिती झालीयत. ती सूध्दा असतीलच. पण अजून कोणकोण पात्र असतील. आणि गौरी-गौतमच्या आयुष्यात नेमके काय घडेल, ते ही कथा जेव्हा मी कागदावर उतरवेन, तेव्हाच सांगू शकेन. MPM नंतर MPM2 व्हायला पाच वर्ष लागली. पण आता ह्या सिक्वलला तेवढा काळ लागणार नाही, असंच वाटतंय.”
मुंबई पुणे मुंबई२ची लेखिका अश्विनी शेंडेला चित्रपटाला मिळालेल्या यशाबद्दल विचारल्यावर ती म्हणाली, “ माझा हा पहिला चित्रपट आहे. पहिलाच चित्रपट यशस्वी झाल्याने एखाद्या परीकथेचा हिस्सा असल्यासारखी अवस्था झालीय. प्रत्येकवेळी चित्रपटाचा शो हाऊसफुल झालेला कळला की, मी एखाद्या लहान मुलीसारखी एक्साईट होतेय. त्यामूळे ह्या सगळ्या गोष्टींचा आनंद पहिल्यांदा मनमुराद लुटणार आहे. सतीशने जरी सिक्वलची घोषणा केली तरीही, ही फिल्म मी लिहेन की नाही, हे आत्ताच सांगू शकत नाही. पण अर्थातच ह्या टीमसोबत काम करायला नक्की आवडेल.”
पुढील स्लाइडमध्ये वाचा, स्वप्नीलसोबत फिल्म पाहण्याची मुक्ताची आहे इच्छा