आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजय-अतुल जोडीची संगीत कारकिर्दीची 15 वर्षे पूर्ण, पुण्यात रंगणार भव्यदिव्य लाईव्ह कॉन्सर्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - मराठी संगीताला एक वेगळीच उंची गाठून देण्यात सिंहाचा वाट कोणाचा असेल तर ते आहे अजय-अतुल. त्यांच्या संगीताने केवळ मराठी रसिकांनाच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीलाही भूरळ घातली आहे. तब्बल 6 वर्षानंतर अजय-अतुल त्यांचा एक लाईव्ह कॉन्सर्ट घेऊन आलो आहोत. निमित्त आहे अजय-अतुल यांनी त्याच्या कारकिर्दीचे 15 वर्षे पूर्ण केले आहेत. 16 व्या वर्षात दिमाखात पदार्पण करताना त्यांनी त्यांच्या चाहत्यांसाठी खास संगीताची मेजवानी देण्याचे ठरवले आहे. असा रंगणार आहे भव्यदिव्य सोहळा...
 
खास लंडनवरुन येणार सिंफनीचा ऑर्केस्ट्रा..
मराठी चित्रपटसृष्टीत इतिहास घडवणाऱ्या सैराटचे सुमधूर संगीत कोण बरे विसरु शकेल? या संगीतातील जादू होती ती लंडन येथील सिंफनी ऑर्केस्ट्राची. याच ऑर्केस्ट्रामधील कलाकार लंडनहून भारतवारी करणार आहेत. या ऑर्केस्ट्राचा हा भारतातील पहिलाच प्रयोग होणार आहे. यावेळी आपण कधीही न पाहिलेली ऐकलेली वाद्यांचा सुरनाद होताना दिसणार आहे. 
 
यावेळी दिलेल्या एका मुलाखतीत अजय-अतुल म्हणाले की, मराठी संगीत खूप मोठे आहे आणि ते तितक्याच ताकदीने लोकांसमोर जाण्याची गरज आहे. त्यासाठीच खास हा लाईव्ह कॉन्सर्ट ठेवण्यात येणार आहे. 6 वर्षानंतर लोकांसमोर लाईव्ह कॉन्सर्ट करण्याबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले, "गेले काही वर्ष वडील गेल्याने आम्ही मानसिकदृष्ट्या खचून गेलो होतो पण नेहमीचे काम सोडता असे वेगळे काही करण्याचा विचार त्यामुळे मनात आला नाही. पण करायचे तर असेच काहीतकी भव्यदिव्य असे ठरवले होते. त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी घडल्या आणि आता या कॉन्सर्टला लोकांचे प्रचंड प्रेम मिळेल याची खात्री आहे" असे अजयने सांगितले. 
 
लाईव्ह कॉन्सर्टमध्ये नसणार कोणी होस्ट...
अजय यांनी सांगितले की, "दोन तासांचा हा कार्यक्रम आहे आणि आम्ही जवळपास 20-22 गाणी गाणार आहोत. मराठी रसिक इतके सुजाण आहेत की आमच्या प्रत्येक गाण्याची सुरुवात झाली की त्यांना कळते. त्यामुळे यावेळी वेळ न घालवता लोकांना एकाहून एक सरस गाणी ऐकवण्यासाठी कोणताही होस्ट ने ठेवण्याचे आम्ही ठरवले आहे. सोबतच या कॉन्सर्टमध्ये डान्सरही असणार नाहीत." 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, अजय-अतूल यांनी सिंफनीमध्ये कसे शूट केले होते 'सैराट' गाणे (VIDEO) ....
बातम्या आणखी आहेत...