आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमच्या संगीत परंपरेला छेद दिल्यानेच 'सैराट'च्या गाण्यांना प्रतिसाद- अजय-अतुल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्रामीण प्रेमकथेवर आधारित असलेला चित्रपट सैराट आणि त्याला अजय अतुल यांचं संगीत म्हणजे ते असंच असणार. रसिकांच्या या गृहितकला छेद देत आम्ही यात वेगळ्या पध्दतीचे प्रयोग केले आहेत. त्यामुळेच तरुणाईकडून भन्नाट प्रतिसाद मिळत असल्याच्या भावना लोकप्रिय संगीतकार अजय अतुल यांनी व्यक्त केल्या. 29 एप्रिल रोजी प्रदर्शित होणाऱ्या सैराटच्या निमित्ताने सैराटची टीम महाराष्ट्रभर चित्रपटाचे प्रमोशन करीत आहे. त्यावेळी प्रयोगशील बंधू अजय-अतुल यांनी हे मत मांडले.

सिम्फनी, एक कडक मराठी गाणं, एकामध्ये पारंपरिक आणि रॉक असे मिश्रण आम्ही केले. चार गाण्यात आम्ही वेगळा प्रयोग करण्यात यशस्वी झाल्याचे प्रतिसादावरून दिसत असल्याचेही या दोघांनी सांगितले. घरात संगीताची कोणतीही परंपरा नसताना जगप्रसिध्द सोनी स्टुडिओमध्ये रेकार्डिंग करण्याची संधी आम्हाला मिळाली हे आमचं भाग्य असल्याचेही ते म्हणाले.
युवा पिढीला जवळचा वाटेल-
शाहरूख खानचा चित्रपट पाहून बाहेर पडणा-या युवकाच्या मनात यातील काहीच आपल्याकडे नसल्याचा न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. पण माझा नायक आणि नायिका आणि वातावरण खेडेगावातील सोलापूर करमाळा भागातीलच असल्याने चित्रपट युवा पिढीला जवळचा वाटणार यात शंका नसल्याचा विश्वास दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी व्यक्त केला. या वेळी अभिनेता आकाश ठोसर, झीचे निखिल साने या वेळी उपस्थित होते.
रिंकू राजगुरू दिलखुलास-
पहिल्याच चित्रपटाच्या माध्यमातून राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत झेप घेतलेल्या अकलूजच्या रिंकू राजगुरूने या वेळी दिलखुलासपणे आपली मते व्यक्त केली. गावाकडच्याच टोनमध्ये बोलताना तिने या चित्रीकरणादरम्यान आलेल्या प्रसंग सांगून सगळ्यांनाच हसवले.
बातम्या आणखी आहेत...