आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अजय-अतुल यांची पुन्हा हिंदीत 'धडक', सैराटच्या रिमेकमध्येही गुंजणार स्वर!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेनमेंट डेस्क - सैराटच्या दैदीप्यमान यशानंतर आता या चित्रपटाचा रिमेक हिंदीतही बनणार आहे. सैराटच्या यशाचे मोठे श्रेय जाते त्यातील गाण्यांना म्हणजेच अजय-अतुल याच्या स्वरसुरांना. या जोडीच्या संगीताचा सैराटच्या यशामध्ये सिंहाचा वाटा आहे. आता पून्हा सैराटच्या हिंदी रिमेकमध्ये अजय-अतुल यांच्याकडेच संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे सांगितले जात आहे. पण याविषयी अजून कोणतीही अधिकृत घोषणा समोर आलेली नाही.  

 

निर्माता करण जोहर याचा धडक हा चित्रपट लोकांसांठी औत्सुक्याचा विषय बनला आहे. या चित्रपटामधून श्रीदेवीची मुलगी जान्हवी आणि शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर डेब्यू करत आहे. त्यामुळे आता धडक लाही अजय-अतुल यांचे स्वरसाज लाभतात का याची प्रेक्षकांना उत्सुक्ता आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, अजय-अतुल यांनी संगीत दिलेले हिंदी चित्रपटाचे पोस्टर्स...

बातम्या आणखी आहेत...