आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या लोकप्रिय खानच्या चित्रपटात गुंजणार मराठमोळ्या अजय-अतुलचे स्वर, हे संगीतकार झाले रिप्लेस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आमिर खानचा आगामी चित्रपट 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' सध्या इंडस्ट्रीमध्ये हॉट टॉपिक आहे. आमिरचा विशेष लुक यात सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. पण आता मराठी प्रेक्षकांसाठी एक खुशखबर आहे. ती अशी की मराठमोळे संगीतकार अजय-अतुल या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन करणार आहेत. सुरुवातीला शंकर-एहसान-लॉय हे त्रिकूट चित्रपटाला संगीत देणार असल्याचे सांगितले जात होते पण आता काही कारणाने त्यांनी या चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. 
 
शंकर-एहसान-लॉय यांनी 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर चित्रपटाच्या स्क्रिप्टमध्ये काही फेरबदल करण्यात आले त्यानुसार या संगीत त्रिकुटाला त्यांच्या चालीमध्ये काही बदल करण्यास सांगण्यात आले. पण त्यांच्याकडे पुरेसा वेळ नसल्याने त्यांनी या चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आता अजय अतुल यांची या चित्रपटात वर्णी लागल्याचे बोलले जात आहे. 
 
एहसान यांनी एका मुलाखतीत सांगितले की, "चित्रपटाच्या स्क्रिप्टमध्ये काही बदल करण्यात आल्यामुळे सर्वच परिस्थिती बदलली. वेळेची कमतरता असल्याने आम्ही योग्य तो बदल करु शकलो नाही आणि त्यामुळेच आम्ही हा प्रोजेक्ट सोडला." विशेष म्हणजे शंकर-एहसान-लॉय यांनीच चित्रपटातून बाहेर पडल्यानंतर अजय अतुलचे नाव पुढे केले होते. या तिघांनी अजय अतुलला मनापासून शुभेच्छाही दिल्या आहेत. 
 
अजय अतुल आनंद.एल.राय यांच्या एका चित्रपटासाठी काम करत असल्याची चर्चा आहे पण त्या चित्रपटाचे नाव अजून निश्चित करण्यात आले नाही. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, अजय-अतुल यांचे संगीत दिग्दर्शक म्हणून हिंदी चित्रपटातील करिअर...
बातम्या आणखी आहेत...