आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Shocking: साउंड ट्रॅक बंद पडला आणि अजय-अतुलचा बनाव झाला उघड?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औंरगाबादः अलीकडेच औरंगाबादमध्ये वेरुळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या दुस-या दिवशी म्हणजे १५ ऑक्टोबर रोजी अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणारी संगीतकार द्वयी अजय-अतुल यांची लाइव्ह इन कॉन्सर्ट आयोजित करण्यात आली होती. ‘नटरंग उभा’ या गाण्याने अजय अतुल यांनी मंचावर झोतात एन्ट्री घेतली. यांची ही कॉन्सर्ट ऐन रंगात आली होती. दोघांचे 'मल्हारवारी...' हे गाणे सुरु होते. मात्र हे गाणे सुरु असतानाच झाला एक मोठा घोळ...

गाणे सुरु असताना अचानक साउंड ट्रँक बंद पडला आणि गोंधळ झाला. साउंड ट्रॅक बंद पडल्यामुळे अजय अतुल यांच्यासह वादक गाणे लाइव्ह सादर न करता साउंड ट्रॅकवर लीप मूव्हमेंट करत असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले असून लाइव्ह कॉन्सर्टमध्ये कलाकार असेच परफॉर्मन्स देतात का, हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
साउंड ट्रॅक बंद पडला तेव्हा ‘मल्हारवारी’ हे गाणे सादर केले जात होते. अचानक आवाज बंद पडल्याने वादक आणि खुद्द अजय-अतुल यांना प्रश्न पडला. हजारो रसिकांसमोर कार्यक्रमात व्यत्यय आल्याने अजय-अतुल संतापले. यावेळी पॉवर कट झाल्याचे सांगत तंत्रज्ञांनी बाजू सावरुन धरण्याचा प्रयत्न केला. अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी हजरजबाबी निवेदनातून कार्यक्रम सावरुन धरला. कार्यक्रमात एकदा हा घोळ झाल्यानंतर मात्र कुठेही पुन्हा ट्रॅकवर गाणे वाजवण्यात आले नाही.
अजय अतुल यांनी पुढची सर्व गाणी लाइव्ह सादर केली. अजय अतुल सोबत या महोत्सवाला स्वप्निल बांदोडकर, कुणाल गांजावाला, अभिजीत सावंत, योगिता गोडबोले हे कलाकार उपस्थित होते. या सर्व प्रकरणावर अजय-अतुल यांनी मात्र अद्याप स्पष्टीकरण दिलेले नाही.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, या कॉन्सर्टमध्ये क्लिक झालेली अजय-अतुल यांची छायाचित्रे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...