आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Father's dayच्या निमित्ताने अजिंक्य देवला मुलाकडून मिळाले स्पेशल गिफ्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव सध्या भलतेच खुशीत आहेत. त्यांचा मुलगा आर्य देवच्या लघुपटाची निवड लिफा महोत्सवात झाली आहे. 

रमेश देव यांचा नातू आणि अजिंक्य देव याचा मुलगा आर्य याने दिग्दर्शित केलेल्या METANOIA या लघुपटाची लिफा महोत्सवात निवड झाली असून आर्यला त्यासाठी खास लंडन येथे आमंत्रित करण्यात आले आहे. लिफा म्हणजे London Independent Film Award हा खूप प्रतिष्ठेचा असा चित्रपट महोत्सव आहे. 29 जुलै रोजी लंडनच्या Roxy Bar and Screen येथे या लघुपटाचे आयोजन करण्यात आले आहे. हा लघुपट सायकॉलॉजिकल मिसऑर्डर याभोवती आहे. आर्यचा हा लघुपट 15 मिनिटांचा आहे. विशेष म्हणजे आर्य देव याने कोणत्याही प्रकारचे चित्रपट दिग्दर्शनाचे प्रशिक्षण घेतलेले नाही. आपला काका अभिनय देव याच्याकडे '24' भाग 2 साठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काही काळ काम केले आहे इतकेच. 

आर्य खूपच मेहनती व फोकस आहे अशा शब्दांत अजिंक्य देव याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. एक प्रकारे ही फादर्स डेची भेट म्हणता येईल. आर्य देव याला लंडनमध्ये यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या रेड कार्पेटसाठीही खास आमंत्रण आहे.
 
पुढील स्लाईड्सवर बघा,  शूटिंग सेटवरचे आर्य देवचे फोटोज..