आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'नागपूर अधिवेशन'मध्ये 'राजकारणी' म्हणून अवतरणार अजिंक्य देव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेता अजिंक्य देव आता राजकारणी म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नागपूर अधिवेशनात त्यांचे हे रुप पाहायला मिळणारेय. सध्या नागपुरात सुरु असलेल्या अधिवेशनात ते येणार की काय, असे तुम्हाला नक्कीच वाटले असेल ना... मात्र अचंबित होऊ नका. ख-याखु-या अधिवेशनात नव्हे तर आगामी 'नागपूर अधिवेशन' या सिनेमात ते राजकारण्याची भूमिका वठवणार आहेत. लवकरच हा सिनेमा रिलीज होणारेय.
आपल्या या नव्या भूमिकेविषयी अजिंक्य देव म्हणतात, ''मराठी सिनेमांमध्ये मला आजही मनाजोग्या भूमिका मिळत असल्याने मी स्वतःला नशिबवान समजतो. नुकत्याच रिलीज झालेल्या 'शिनमा' या सिनेमात मला दिग्दर्शकाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. आता आगामी 'नागपूर अधिवेशन' या सिनेमात मी राजकारणी साकारतोय. हा एक विनोदी धाटणीचा सिनेमा आहे. या सिनेमांव्यतिरिक्त मी स्टार प्लस वाहिनीवरील एका मेगा सिरीअलच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. शिवाय आमच्या होम प्रॉडक्शनच्या '24' सीरिजमध्येही मी काम करतोय. लवकरच ही मालिका छोट्या पडद्यावर सुरु होणारेय. इतकेच नाही तर 'बॉम्बेरिया' नावाच्या इंडो-ब्रिटिश सिनेमातही मी लीड रोल साकारतोय.''
बातम्या आणखी आहेत...