आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'अजिंक्यतारा\' पुरस्कार सोहळा अचानक रद्द, एअरपोर्टवरून माघारी फिरले मराठी कलाकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉरिशसमध्ये होणा-या 'अजिंक्यतारा' हा मराठमोळा पुरस्कार सोहळा गुरुवारी (20 ऑगस्ट) अचानक रद्द करण्यात आला. त्यामुळे या पुरस्कारासाठी निघालेल्या सर्व मराठी कलाकारांना एअरपोर्टवरून माघारी परतावे लागले.
मराठी सिनेसृष्टीतील पहिला 'अजिंक्यतारा' हा पुरस्कार सोहळा 21 ते 23 ऑगस्ट मॉरिशसमध्ये स्वामी विवेकानंद कन्व्हेशन सेंटर ये भव्य सभागृहात आयोजित करण्यात येणार होता. सुपरव्हिस्ट एन्टरटेन्मेंटने या आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. सई ताम्हणकर यासाठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड झाली होती.
या सोहळ्याच्या निमित्ताने परफॉर्मन्स तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाची तयारी सुरु होती. मानसी नाईक, अमृता खानविलकर, नेहा पेंडसे अभिजीत केळकरसारख्या प्रसिध्द कलाकारांचा सोहळ्यात सहभाग होता. सर्व तयारी झाली आणि कलाकार मॉरिशसला निघाले. तब्बल 80 कलाकार या पुरस्कार सोहळ्यात सहभागी होणार होते. मात्र अचानक सर्वांच्या मोबाईवर पुरस्कार सोहळा रद्द झाल्याने मॅसेज आले. सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. कार्यक्रम का रद्द करण्यात आला याचे कारणदेखील त्यांना देणात आले नाही.
आयोजकांनी आमचा आपमान केल्याची भावना त्यांचा मनात निर्णाम झाली. मेहनत वाया गेल्याचे दु:ख तर होतच, सोबतच असा प्रकार पहिल्यांदा घडला. याबाबत अभिजीत केळकर या मराठी कलाकारने दु:ख व्यक्त केले. आयोजकांपैकी मुख्य 'सिनेयुग' कंपनीने हा कार्यक्रमा रद्द केल्याचे सांगण्यात येत आहे.
या अवॉर्ड्स सोहळ्याची नॉमिनेशन नाइटसुध्दा मागील दिवसांत मुंबईत रंगली होती. तेव्हा, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, सिध्दार्थ जाधव, महोश कोठारे, आदिनाथ कोठारे, उर्मिला कानिटकर, सचिन पिळगांवकर, अमितराज, उमेश जाधव, पुष्कर श्रोत्री, किशोरी शहाणे, मानसी नाईक, हृषिकेश जोशी असे अनेक सेलेब्स उपस्थित होते. पहिल्यांदाच असा पुरस्कार सोहळा पार पडणार होता. मात्र त्यालाही ग्रहण लागले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, या अवॉर्ड्स सोहळ्याच्या नॉमिनेशन नाइट पार्टीचे काही PHOTOS...