आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

XCLUSIVE : अक्षय कुमार-संजय जाधवची नवी कलाकृती \'दादा\', पाहा फस्ट लूक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोः डावीकडून - दिग्दर्शक संजय जाधव, 'दादा' सिनेमाचे पोस्टर, अभिनेता अक्षय कुमार)

२०१३ ला ‘७२ मैल एक प्रवास’ या चित्रपटाद्वारे अक्षयकुमारने मराठी फिल्म इंडस्ट्रीत प्रवेश केला. राजीव पाटील दिग्दर्शित आणि अक्षय कुमार निर्मित या चित्रपटाला प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी पसंतीची पावती दिलीच. पण त्याचसोबत या सिनेमावर पुरस्कारांचीही बरसात झाली. आता तीन वर्षांनी अक्षयकुमार आपल्यासाठी त्याचा दुसरा चित्रपट घेऊन येतोय.
अक्षय कुमारच्या या नव्या चित्रपटाचं फस्ट लूक पोस्टर divyamarathi.com च्या हाती लागले आहे. अक्षय कुमारच्या या नव्या चित्रपटाचं नांव आहे, ‘दादा’. ‘दादा’चं दिग्दर्शन सध्याचा मराठीतला आघाडीचा दिग्दर्शक संजय जाधव करणार आहे. संजय सध्या त्याच्या ‘तू हि रे’ च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. त्यामुळे हा चित्रपट पूर्ण झाल्यावरच तो ‘दादा’ चित्रपटाच्या दिग्दर्शनाची सूत्र हाती घेईल.
Divyamarathi.com ला सूत्रांकडनं मिळालेल्या या माहितीला संजय जाधवने दूजोरा दिलाच. पण या चित्रपटाविषयी अधिक माहिती सांगायला मात्र तो तयार नाही. अक्षय उत्तम मराठी बोलतो, आणि त्याने मराठी चित्रपट करण्याची आवड असल्याचं याअगोदर बोलूनही दाखवलंय. त्यामुळे आता ‘दादा’च्या प्रमुख भूमिकेत अक्षय कुमार आहे का? अशी प्रश्न उपस्थित करताच, संजय यात अक्षय नसल्याचंही सांगतो.
चित्रपट २०१६च्या जानेवारी महिन्यात प्रदर्शित करण्याचा मानस असल्याने, सिनेमाच्या संहितेवर सध्या अक्षयच्या ‘गेझिंग गोट’ या प्रॉडक्शन हाऊसच्या कार्यालयात काम चालू आहे. या चित्रपटातल्या स्टारकास्टला फायनल करण्यात आलं असल्याची माहिती मिळते आहे. मात्र अक्षय कुमार किंवा संजय जाधव मात्र या चित्रपटाबद्दलची माहिती सध्या गुप्तचं ठेवतायत.
महाराष्ट्रात अनेक ‘दादा’ नेते, अभिनेते होऊन गेले आहेत. चळवळींनी सुध्दा महाराष्ट्राला आपलेसे वाटणारे दादा दिले. पण आता यातल्या कोणत्या ‘दादा’वर हा चित्रपट आधारित असणार आहे, आणि कोणता अभिनेता ह्या ‘दादा’च्या भूमिकेत दिसणार आहे, याची उत्सुकता मात्र ताणली गेली आहे. मात्र या चित्रपटाच्या दुस-या पोस्टरवरून फिल्म दादा कोंडकेंच्या आयुष्यावर असल्याचं समजतयं. पण चित्रपटाच्या युनिटेने गुप्तता पाळल्याने त्यांनी दुजोरा द्यायला नकरा दिला आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, 'दादा' या सिनेमाविषयी अक्षय कुमारने केले ट्विट आणि सोबतच सोशल नेटवर्किंग साइटवर शेअर करण्यात आलेल्या पोस्टर्सची झलक...