आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी फिल्मच्या म्युझिक लाँचला अक्षयने सासूसमोर केला मोठा खुलासा, जाणून घ्या काय घडले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः बॉलिवूडचा खिलाडी अर्थातच अभिनेता अक्षय कुमारचे मराठी प्रेम लपून राहिलेले नाही. त्याला मराठीत गप्पा मारायला आवडतात. मराठी भाषा आवडत असली तरी त्या भाषेत मोकळ्या गप्पा मारण्याची संधी त्याला क्वचितच मिळते. अलीकडेच त्याला ही संधी ‘कौल मनाचा’ या मराठी सिनेमाच्या म्युझिक लाँचच्या निमित्ताने मिळाली. या सिनेमाच्या म्युझिक लाँचला अक्षय त्याच्या सासूबाई डिंपल कपाडियासोबत पोहोचला. यावेळी अक्षयने त्याच्या शाळेतील एक मजेशीर किस्सा सगळ्यांसोबत शेअर केला.

शाळेत, महाविद्यालयात सुंदर शिक्षक, शिक्षिकेवर प्रेम करणाऱ्या मुला-मुलींच्या कथा हिंदी-मराठी सिनेमातून अनेकदा पहायला मिळाल्या आहेत. मात्र शाळेत तसा विचार करणेही अक्कीला महाग पडले होते. आपल्या मित्राला या शिक्षिकेवर माझे प्रेम आहे हे सांगणाऱ्या अक्कीला त्याच शिक्षिकेने पकडले आणि त्याच्या बालसुलभ मनातील हे थोर विचार ऐकून चक्रावलेल्या शिक्षिकेने त्याची दोन दिवस शाळेतून हकालपट्टी केली होती.

‘कौल मनाचा’ या सिनेमाच्या निमित्ताने अक्षयच्या गप्पांचा योग जुळून आला होता. या सिनेमातील लहान मुलांची कथाही अशीच त्यांच्या आवडत्या शिक्षिकेभोवती फिरत असल्याने अक्षयला त्याची ही शाळेतली गंमत आठवली आणि त्याने लगेच ती सगळ्यांना ऐकवली.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन वाचा, कसा रंगला म्युझिक लाँच सोहळा...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...