आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमृतासाठी आलिया भटने लिहीले हे खास पत्र, ते वाचताच भारावलेल्या अमृताने केले असे काही..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या मराठी आणि हिंदी या दोन्ही क्षेत्रात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवत आहे. अमृताने नुकतेच हिंदी चित्रपट राजी चे शूटिंग पूर्ण केले आहे. या चित्रपटात अमृतासोबत आलिया भट्ट आणि वि्ककी कौशल यांनी अभिनय केला आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान आलिया आणि अमृताची चांगलीच बाँडींग जमली होती. आलियाने अमृतासाठी लिहीले पत्र..
 
या चित्रपटाच्या चित्रीकरणानंतर आलियाने अमृतासाठी एक खास पत्र लिहीले आहे आणि त्यात तिच्या अभिनयाचे कौतुकही केले आहे. आलियाचे हे पत्र वाचून भारावलेल्या अमृताने ते पत्र तिच्या चाहत्यासोबत शेअर केले आहे. या पत्रासोबत अमृताला आलियाने काही भेटवस्तुही पाठवल्या आहेत. 
 
अमृताने सोशल मीडियावर हे सर्व फोटो शेअर केले आहे. यावेळी तिने आलियाचे आभार मानले आहे आणि राजीचा अनुभव तिच्यासाठी किती खास होता हे सांगितले आहे. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, आलियाने पाठवलेल्या गिफ्टचे आणि त्यांचे ऑन लोकेशन फोटोज्..
बातम्या आणखी आहेत...