आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Alibaba Aani Chalishitale Chor And Mr. & Mrs. Marathi Natak

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'मिस्टर आणि मिसेस' आणि 'अलिबाबा चाळीशीचे चोर' यांना 'सलाम पुणे' पुरस्कार जाहीर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('मिस्टर अँड मिसेस 'आणि 'अलिबाबा चाळीशीचे चोर' या नाटकांचे पोस्टर)
पुणेः 'मिस्टर अँड मिसेस 'आणि 'अलिबाबा चाळीशीचे चोर' या रंगभूमीवर गाजणा-या नाटकांना 'सलाम पुणे' हा पुरस्कार जाहिर झाला आहे. यंदाच्या मराठी रंगभूमी दिन समारंभात सर्वोत्कृष्ट नाटकांसाठीचे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. याशिवाय जळगावचे ज्युनिअर अमिताभ बच्चन अर्थात शशिकांत पेद्वाल, चंद्रशेखर महामुनी आणि हस्याकालावंत संतोष चोरडिया यांनाही 'सलाम पुणे' पुरस्कार जाहीर झाले आहेत. सलाम पुणेचे अध्यक्ष शरद लोणकर आणि उपाध्यक्षा सोनिया बर्वे यांनी या पुरस्कारांची घोषणा केली.

या दोन्ही नाटकाचे निर्माते दिग्दर्शक आणि सर्व कलावंत यावेळी उपस्थित राहणार असून निर्मात्या पुनम शेंडे, मेघराज भोसले, विशाल गवारे, मच्छिंद्र धुमाळ, सुवदन आंग्रे, दिग्दर्शक शिव कदम, दीपक सवाखंडे, संगीतकार हर्षित अभिराज, आदी रामचंद्र, ज्येष्ठ पत्रकार अरुण लोणकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. येत्या 5 नोव्हेंबर रोजी एस. एम जोशी सभागृह, नवी पेठ, पुणे येथे हा कार्यक्रम रंगणार असून यामध्ये प्रतीकात्मक अशा 'कौन बनेगा करोडपती, तसेच सदाबहार 'देव'च्या सदाबहार गाण्यांची आनंदयात्रा आणि हसवा हसवी अशा कार्यक्रमांचा समावेश आहे.
'मिस्टर अँड मिसेस' या नाटकाचा 111वा प्रयोग 24 ऑगस्ट 2014 रोजी झाला आहे. पहिला प्रयोग 11 जानेवारी 2014 रोजी झाला होता. 'मिस्टर अँड मिसेस' हे नाटक म्हणजे रिअॅलिटी शो आता कुठल्या थरापर्यंत जाऊ शकतात आणि सर्वसामान्यांच्या आयुष्यात किती आणि कशी ढवळाढवळ करू शकतात, त्याचे उत्तम उदाहरण आहे. यातील चिन्मय मांडलेकर आणि मधुर वेलणकर यांच्या उत्तम अभिनयाने आजतागायत अनेक पारितोषिके पटकावली आहेत.
‘अलिबाबा आणि चाळीशीतले चोर’ हे जरा चावट पण चाळीशीतल्या रसिकांना ‘रिलेट’ करणारे आणि स्त्री-पुरुष संबंधातली गुंतागुंत मांडणारे नाट्य आजतागायत असंख्य रसिकांनी ‘एन्जॉय’ केले. दिग्दर्शक अजित भुरे, नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये, नरेंद्र भिडे यांचे पार्श्वसंगीत शीतल तळपदे यांची प्रकाश योजना, आनंद इंगळे आणि विद्याधर जोशी यांच्यासह सर्व कलाकारांचा उल्लेखनीय अभिनय अशा सर्वांचे कसब या नाटकाला उत्कृष्टतेची मखमली चादर बहाल करून गेले आहे.