आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: आता अशा दिसतात अलका कुबल, बघा एक काळ गाजवणा-या अॅक्ट्रेसेसचा लेेेटेस्ट LOOK

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः मराठी सिनेमातील सोशिक सून म्हणून ओळखल्या जाणा-या अभिनेत्री अलका कुबल यांचा आज वाढदिवस असून त्यांनी वयाची ५३ वर्षे पूर्ण केली आहेत. २३ सप्टेंबर १९६३ रोजी मुंबईत त्यांचा जन्म झाला. मराठीत सासर-माहेर सिनेमांची लाट आणण्याचे श्रेय त्यांना द्यावे लागेल. सामान्य घरातून आलेल्या अलका कुबल यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. कै. दत्ता भट आणि शांता जोग यांच्याबरोबर त्यांनी बालकलाकरार म्हणून 'नटसम्राट' या गाजलेल्या नाटकाचे तब्बल अडीचशे प्रयोग केले. याशिवाय 'संध्याछाया, वेडा वृंदावन, मी मालक या देहाचा ही नाटकेही केली. मधल्या काळात गुजराती, भोजपुरी चित्रपटही केले. नायिका म्हणून सुस्थापित होण्यासाठी त्यांना अण्णासाहेब देऊळकर यांचा 'लेक चालली सासरला' या सिनेमाची वाट पहावी लागली. यात हुंडाबळी असलेल्या सुनेची भूमिका करण्याची संधी त्यांना मिळाली हा सिनेमा तुफान चालला. त्यानंतर त्यांना अनेक सिनेमांच्या ऑफर येऊ लागल्या.

'माहेरची साडी' या सिनेमामुळे एका रात्रीत त्यांना स्टारपद मिळालंं. या सिनेमातील त्यांच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले होते. हा त्याकाळच्या हिट सिनेमांपैकी एक सिनेमा होता. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, दादा कोंडके, सचिन अशा मराठीतील आघाडीच्या नायकांबरोबर त्यांनी भूमिका केल्या. हिंदीमधल्या 'चक्र' (नसीरुद्दीन शाह), 'शिर्डी के साई बाबा' या सिनेमांतील भूमिका उल्लेखनीय आहेत. अलका कुबल यांनी दोनशेहून अधिक सिनेमांमध्ये अभिनय केला आहे.
अलका कुबल यांच्याप्रमाणेच ऐंशी आणि नव्वदच्या दशकात सुप्रिया पिळगावकर, निवेदिता जोशी-सराफ, अश्विनी भावे, प्रिया बेर्डे, ऐश्वर्या नारकर, वर्षा उसगांवकर, प्रतिक्षा लोणकर या अभिनेत्रींनी आपल्या अभिनयाने मराठी सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवलं. या अभिनेत्रींचा एक मोठा चाहता वर्गदेखील आहे. आपल्या सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर अनेक वर्षे या अभिनेत्रींनी सिनेमांत आपला दबदबा कायम ठेवला. यापैकी काही जणी आजही सिनेसृष्टीत कार्यरत आहेत, तर काहींना मात्र आता काम कमी केले आहे.
या सौंदर्यवती आज कशा दिसतात हे तुम्हाला ठाऊक आहे का ? अनेक अभिनेत्रींनी आता वयाची पन्नाशी ओलांडली आहे. वाढत्या वयोमानानुसार त्यांच्यात बराच बदल झालेला दिसून येतोय. आज आम्ही तुम्हाला या अभिनेत्री आता कशा दिसतात हे छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहोत.

मराठी इंडस्ट्रीतील गतकाळातील अभिनेत्रींचे आताचे रुप बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...