आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'माहेरची साडी'ची 26 वर्षे: अलका कुबलला नव्हे भाग्यश्रीला झाला होता ऑफर, याचा आहे रिमेक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः दिग्दर्शक विजय कोंडके यांनी मराठीतील ब्लॉकबस्टर ठरलेल्या 'माहेरची साडी' या सिनेमाच्या रिलीजला आज 26 वर्षे पूर्ण झाली आहेत. आजच्याच दिवशी म्हणजे 18 सप्टेंबर 1991 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता या सिनेमाच्या सिक्वेलची घोषणा करण्यात आली असून सिक्वेलची पटकथा तयार आहे. पण अद्याप कलाकारांची निवड फायनल व्हायची आहे. सातारा जिल्ह्यातील इंगवली या ठिकाणी 'माहेरची साडी 2' या चित्रपटाचे चित्रीकरण होणारेय. दुस-या भागात कोणकोणत्या कलाकारांची वर्णी लागणार याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
 
'माहेरची साडी' चित्रपटात अभिनेत्री अलका कुबल यांनी सोशिक सूनेची मध्यवर्ती भूमिका साकारली होती. त्यावेळी मराठीत बऱयाच काळानंतर एखाद्या चित्रपटाने एवढे घसघशीत यश मिळविले होते. मुख्य म्हणजे या चित्रपटामुळे अलका कुबल हे नाव महाराष्ट्रातील घराघरांत जाऊन पोहोचले. पण या चित्रपटासाठी अलका कुबल नव्हे तर हिंदीतील प्रसिद्ध भाग्यश्रीला दिग्दर्शकांची पहिली पसंती होती, हे तुम्हाला ठाऊक आहे का...

चित्रपटाच्या रिलीजला 26 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जाणून घेऊयात 'माहेरची साडी' या चित्रपटाविषयीच्या या खास गोष्टी...
बातम्या आणखी आहेत...