आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओह माय गॉड.... हे काय रिंकू आणि आकाशमध्ये चक्क बिनसले, काय झाले नेमके!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर - Divya Marathi
रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर
एन्टरटेन्मेंट डेस्कः दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या सैराट या सिनेमाने मराठी सिनेसृष्टीत नवा इतिहास रचला असून हा सिनेमा 100 कोटींकडे वाटचाल करतोय. या सिनेमामुळे अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेले रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर हे नवोदित चेहरे एका रात्रीतून सुपरस्टार झाले. या सिनेमात प्रियकर-प्रेयसीची भूमिका साकारणारे हे दोघे खासगी आयुष्यात चांगले मित्र झाले. या सिनेमाच्या शूटिंगच्या निमित्ताने बरेच महिने इतर कलाकारांसोबत हे दोघेही नागराज मंजुळेंच्या घरीच वास्तव्याला होते. खरं तर शूटिंगच्या आधी या दोघांची एकमेकांशी ओळख नव्हती. मात्र शूटिंगदरम्यान त्यांची चांगली ओळख झाली. सिनेमा रिलीज होण्याआधी आणि आतासुद्धा प्रोमोशनल अॅक्टिव्हिटीमध्ये हे दोघे कायम एकत्र दिसत आहेत.

पण आता मात्र या दोघांमध्ये बिनसले असल्याची चर्चा आहे. डीएनच्या वृत्तानुसार, या दोघांमध्ये आलबेल नसल्याचे म्हटले गेले आहे. एकमेकांचे चांगले मित्र असणारे रिंकू आणि आकाश एकमेकांना टाळत असल्याचे बोलले जातेय. मात्र यांच्यात कोणत्या मुद्यावरुन कटुता निर्माण झाली, हे अद्याप समजू शकलेले नाही.

या दोघांमध्ये सर्वकाही सुरळीत नसल्याचे म्हटले जात असले, तरीदेखील हे दोघे प्रमोशन एकत्रच करताना दिसत आहे. नुकतेच दोघे माधुरी दीक्षितच्या डान्स रिअॅलिटी शोमध्ये पोहोचले होते. तर शनिवारी कन्नड येथे दहावीच्या गुणवंतांचा सत्कार या दोघांच्या हस्ते होतोय. त्यामुळे येणा-या दिवसांत या दोघांची मैत्री कायम राहणार की त्यात दुरावा निर्माण होणार, याकडे नक्कीच त्यांच्या चाहत्यांचे लक्ष लागून राहणारेय.

एक नजर टाकुया, या दोघांनी प्रमोशन, पार्टी, इव्हेंट्समध्ये एकत्र घालवलेल्या काही निवडक क्षणांवर...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)