आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • American Marathi Model Miss India USA Finalist Nisha To Feature In Gujarati Film

ही Miss India USA Finalist आहे मराठी मुलगी, लवकरच दिसणार गुजराती सिनेमात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेत जन्मलेली मराठी मॉडेल निशा कलमदानी लवकरच एका गुजराती सिनेमात झळकणार आहे. अमेरिकेतल्या फॅशन मॅगझिन्समध्ये झळकलेली निशा ब-याचदा न्युयॉर्क आणि न्युजर्सीतल्या फॅशन डिझाइनर्सच्या फॅशन शोजमध्ये सुध्दा रॅम्पवॉक करते. तिथल्या टेलिव्हीजन जाहिरातीही तिने केल्यात. मिस इंडिया युएसए २०१४च्या अंतिम पाच विजेत्यांमध्ये ती होती. तर IMIFF 2015 मध्ये तिला मिस फोटोजेनिक हा अवॉर्डही मिळालाय.
ह्या मराठी निशाला गुजराती फिल्म कशी मिळाली हे सांगताना ती म्हणते, “मी एका फॅशन इव्हेंटमध्ये रॅम्प वॉक करत असताना, तिथल्या आयोजकांकडून माझ्या गुजराती सिनेमाच्या फिल्ममेकर्सना मी भारतीय आहे, हे कळलं. त्यांनी मला संपर्क केला, आणि सिनेमात काम करशील का असं विचारलं. मी वयाच्या आठव्या वर्षी जेव्हा माझ्या आयुष्यतली पहिली जाहिरात केली होती. तेव्हापासूनच मला मॉडेल आणि एक्टरेस बनायचं होतं. त्यात मी भारतीय असल्याने कोणत्याही भारतीय भाषेत फिल्म करायला मला अर्थातच आवडलं. आणि मी लगेच होकार कळवला.”
निशा तिच्या गुजराती फिल्मविषयी सांगते, “ही पहिली गुजराती फिल्म आहे, जिचं चित्रीकरण न्युयॉर्क, फ्लोरिडा आणि न्युजर्सीत झालंय. घरी मराठी आणि घराबाहेर इंग्रजीत बोलल्याने मी गुजराती भाषेशी अवगत नव्हते. पण गुजारीत खूप कठीण नाहीये. शब्दोच्चारण शिकवायला फिल्ममेकर्स आणि सहकलाकार होतेच. त्यामुळे अवघड गेलं नाही. आता ही फिल्म रिलीज झाल्यावर माझ्या अभिनयाला लोकांचा काय प्रतिसाद मिळतोय. ते पाहून पुढचं एक्टिंग करीयर प्लॅन करेन. कारण भारतीय सिनेमात एक्टिंग करायची असेल, तर मग मला पूर्णवेळ मुंबईत राहणं आवश्यक आहे. अमेरिकेतून ते शक्य नाही, हे मला ठावूक आहे.”
कलावंत जर मराठी असला, तर त्याला रंगभूमीचं विशेष आकर्षण असतं. कारण मराठी रक्तातच रंगभूमीविषयीचं प्रेम आहे. निशाचंही तसंच आहे. ती सांगते, “माझ्या आईचे वडिल, माझे आजोबा शेष दाभोळकर रंगकर्मी होते. त्यांनी श्रीराम लागू, अरविंद देशपांडे, अरूण सरनाईक, प्रभाकर पणशीकर, किशोर प्रधान ह्यांच्यासोबत काम केलंय. त्यामुळे अभिनय माझ्या रक्तातच आहे. मीही इथे अमेरिकेत चॅरिटीसाठी नाटक केलंय. मी भारतात अधूनमधून येते. त्यात आम्ही इथल्या मराठी मंडळातही जात असतो. त्यामुळे अजूनही मराठी संस्कृतीशी माझी नाळ घट्ट जोडली गेलेली आहे. आज गुजराती फिल्म करतेय. कदाचित उद्या मराठी आणि हिंदीही करेन. “
पुढील स्लाइडमध्ये पाहा निशा कलमदानीचे फोटो