आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूडच्या महानायकाने केले पुष्कर श्रोत्रीच्या फिल्मचे कौतुक, शेअर केला Trailer

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता पुष्कर श्रोत्री आता दिग्दर्शक म्हणून नवीन इनिंग सुरु करतोय. पुष्करने दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाचे नाव आहे उबुंटू. अलीकडेच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. शाळेसाठी जिद्दीने लढणा-या मुलांची गोष्ट सांगणारा उबुंटू हा सिनेमा आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला अवघ्या चोवीस तासांत साडे चार लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले.
 
विशेष म्हणजे बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चनसुद्धा उबुंटूचा ट्रेलर बघून भारावून गेले आहेत. त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर चित्रपटाचा ट्रेलर शेअर करुन त्याचे कौतुक केले आणि सिनेरसिकांना ट्रेलर पाहण्याचे आवाहनदेखील केले. बिग बी लिहितात,  “भारतीय सिनेमा कात टाकतो आहे आणि दिवसेंदिवस विविध चांगले विषय तसंच कथा सिनेमाच्या माध्यमातून हाताळल्या जात आहेत. त्यामुळे उंबुटू या मराठी चित्रपटाचा ट्रेलर नक्की बघा.”

अमिताभ बच्चन यांच्याकडून आपल्या पहिल्याच चित्रपटाला पसंतीची पावती मिळाल्याने पुष्कर श्रोत्री अतिशय आनंदात आहे. त्यानेही सोशल मीडियाच्या माध्यमातून बिग बींचे आभार व्यक्त केले आहे. बिग बींनी आपला चित्रपट नक्की बघावा, अशी आशाही त्याने व्यक्त केली आहे. पुष्करने पोस्ट केले, “माझ्यासाख्या नवख्या आणि दिग्दर्शक म्हणून नवी इनिंग सुरु करु पाहणा-याला भारतीय चित्रपटसृष्टीच्या शहेनशाहचे अशाप्रकारे आशीर्वाद मिळणे हे मी माझं भाग्य समजतो. माझी नम्र आणि मनापासून इच्छा आहे की बिग बींना उंबुटू हा चित्रपट बघण्यासाठी वेळ मिळावा.”, 
 
'उंबुटू' या चित्रपटात अभिनेता सुबोध भावेचा मुलगा मल्हार एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. येत्या 15 सप्टेंबर रोजी हा चित्रपट सिनेरसिकांच्या भेटीला येतोय. 

चला तर मग पाहुयात, या चित्रपटाचा ट्रेलर आणि 'उबुंटू' म्हणजे नेमके काय, हे सांगणारे चित्रपटाचे टायटल ट्रॅक आणि सोबतच बिग बी आणि पुष्कर श्रोत्री यांच्या फेसबुक पोस्ट... 
बातम्या आणखी आहेत...