Home »Bollywood »Marathi Cinekatta» Amitabh Bachchan In Marathi Movie Akka

...आणि जेव्हा मराठमोळ्या अवतारात महानायक झळकले होते चित्रपटात, गायली होती गणेश आरती

दिव्य मराठी वेब टीम | Oct 12, 2017, 10:03 AM IST

मुंबई - आज महानायक अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस. एखादा राष्ट्रीय सण साजरा करावा याप्रमाणेच या दिवसाचे संपूर्ण भारतवासियांना महत्तव आहे. अमिताभ हे एक असे नाव आहे ज्यांच्या नावाने काही देशांमध्ये भारताची ओळख आहे यावरुनच कल्पना येते की अमिताभ हे नाव किती मोठे आहे.

पण इतके मोठे नाव असलेले अमिताभ जेव्हा रिजनल सिनेमात काम करतात ती चाहत्यांसाठी फारच मोठी गोष्ट आहे. फार कमी जणांना माहीत आहे की, अमिताभ बच्चन यांनी एका मराठी चित्रपटात एक लहानशी भूमिका केली होती. 1994 साली आला होता चित्रपट...
अमिताभ बच्चन यांनी 1994 साली आलेल्या अक्का या मराठी चित्रपटात एका गाण्यापुरता रोल केला होता. विशेष म्हणजे या गाण्यात अमिताभ यांच्यासोबत जया बच्चनही झळकल्या होत्या. अमिताभ यांचा हेअरस्टायलिस्ट दीपक सावंत यांच्या प्रोडक्शनखाली हा सिनेमा बनला होता. सिलसिला या हिट चित्रपटानंतर अमिताभ आणि रेखा प्रथमच सिनेमात सोबत झळकले होते.
इतकेच नाही अमिताभ यांनी पंजाबी, मल्याळम, बंगाली, भोजपुरी यांसारख्या चित्रपटातही काम केले आहे.
पुढच्या स्लाईडवर पाहा त्यांच्या इतर रिजनल चित्रपटांविषयी काही खास माहिती...

Next Article

Recommended